नवी दिल्ली - आरबीआयचे गव्हर्नर, इंडियन बँकिंग असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याविरोधात न्यायालयाच अवमान झाल्याप्रकरणी कारवाई करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ही याचिका विविध कंपन्यांनी दाखल केल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयात अझीझ ट्रेडिंग कंपनी, उमराझ ट्रेडिंग कॉर्पोरेशन, अजय हॉटेल अँड रेस्टॉरंट लातूर यांनी वकील विशाल तिवारी यांच्यातर्फे याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास, इंडियन बँक्स असोसिएशनचे मुख्य अध्यक्ष यांनी नियमांचे पालन बंधनकारक होते. मात्र, ते नियम पालन करण्यात अयशस्वी ठरल्याचे याचिकेत म्हटले आहे.
हेही वाचा-ट्विटरकडून ब्ल्यू बॅजची पडताळणी बंद; पुन्हा प्रक्रिया करणार सुरू
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन-
सर्वोच्च न्यायालयाच्या ३० सप्टेंबर २०२० च्या आदेशानुसार सर्व कर्ज देणाऱ्या संस्था व बँकांच्या कर्जदारांना कोरोनामुळे आर्थिक तणावात दिलासा दिला होता, असे अॅड तिवारी यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हे आरबीआयचे गव्हर्नर व इंडियन बँक्स असोसिएशन यांच्या वकिलांच्या उपस्थितीत देण्यात आले होते. त्यामुळे त्यांना स्थगितीच्या आदेशाची कल्पना होती, असे याचिकेत म्हटले आहे.
हेही वाचा-मुंबई पेट्रोलच्या दराने ओलांडले शतक; सामान्यांच्या खिशाला कात्री
बदनामी झाल्याचा याचिकाकर्त्याचा दावा-
आरबीआयचे गव्हर्नर आणि इंडियन बँक्स असोसिएशनच्या मुख्य अध्यक्षांनी केवळ न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला नाही, तर याचिकाकर्त्यांची प्रतिमा खराब केल्याचेही म्हटले आहे. याचिकाकर्त्यांना बजाविलेल्या नोटीसची वर्तमानपत्रात बदनामी झाल्याचे वकील तिवारी यांनी म्हटले आहे.