नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात लोकांना कोणती चिंता भेडसावते? याचे ऑनलाईन सर्वेक्षण लखनौ येथील आयआयएमने केले. या सर्वेक्षणामधून लोकांना कोरोनाहून अधिक आर्थिक संकटाची चिंता भेडसावत असल्याचे दिसून आले.
आयआयएम लखनौमधील सेंटर फॉर मार्केटिंग इन इमर्जिंग इकॉनॉमिक्स विभागाने ऑनलाईन सर्वेक्षण केले. यामध्ये ७९ लोकांनी चिंता, ४० लोकांनी भीती तर २२ टक्के लोकांनी दु:ख वाटत असल्याचे म्हटले आहे. या सर्वेक्षणामध्ये २३ राज्यांत राहणाऱ्या १०४ शहरांमधील नागरिकांनी सहभाग घेतला.
हेही वाचा- कोरोनाचा परिणाम; नोकरीच्या शोधात असलेले म्हणतात.. घरूनच काम हवे!
- बहुतांश लोकांनी टाळेबंदीने होणाऱ्या आर्थिक परिणामांमुळे चिंता वाटत असल्याचे म्हटले आहे. टाळेबंदीनंतर लोक अतर्क्य वागतील, अशी लोकांना भीती आहे.
- ३२ टक्के लोकांना आर्थिक परिणामांची भीती वाटते. तर १५ टक्के लोकांना बेजबाबदार वागण्याची भीती वाटते. तर १६ टक्के लोकांना अनिश्चितेची भीती वाटते.
- टाळेबंदीचा आर्थिक परिणाम किती दिवस राहणार ही सर्वात मोठी चिंता वाटत असल्याचे बहुतेकांनी सांगितले. तर कोरोनाचा संसर्ग होण्याची चिंता १४ टक्के लोकांना वाटते. हे सर्वेक्षण सत्यभुषण दास आणि अविनाश जैन (आयआयएम) यांनी अशू साभरवाल आणि अंकिता सिंग (क्वालिसिस रिसर्च अँड कन्स्टल्टिंग) आणि मोहनकृष्ण यांच्या सहकार्याने केले आहे.
हेही वाचा-जाणून घ्या, रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना