नवी दिल्ली - गेल्या पाच वर्षात सेवा सुधारल्याने रेल्वे प्रवाशांना कोणताही त्रास होत नसल्याचे केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले. येत्या काही वर्षात भारत हा रेल्वे डबे निर्मितीचे हब होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
गोयल यांनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशातील स्वच्छ रेल्वे स्टेशनचा नवी दिल्लीत अहवाल प्रसिद्ध केला. यावेळी बोलताना गोयल म्हणाले, गेल्या पाच वर्षात रेल्वेच्या प्रवासाचा अनुभव बदलला आहे. लोकांना प्रवासात कोणताही त्रास होत नाही. त्यांना आरामात प्रवास करता येतो.
पुढे ते म्हणाले, स्वच्छतेचे आपल्या जीवनात महत्त्व आहे. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला स्वच्छता अभियानाला मोठा प्रतिसाद दिला. हे गांधींना सर्वात मोठे अभिवादन आहे. देशातील ६ हजार ५०० रेल्वे स्टेशनवर जनजागृतीसाठी स्वच्छता अभियानाचा उपक्रम हाती घेण्यात आला.
-
आज नई दिल्ली स्टेशन पर 'स्वच्छ भारत' कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां बापू की 150वीं जयंती पर उन्हें याद करते हुए श्रद्धांजलि दी।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
रेलवे ने अपने #MannMeinBapu के विचारों को आत्मसात किया है, तथा गंदगी और प्रदूषण से लड़ने के लिये कई कदम उठाये हैं।https://t.co/KoZBCtk3B0 pic.twitter.com/9Fr3dJtYMQ
">आज नई दिल्ली स्टेशन पर 'स्वच्छ भारत' कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां बापू की 150वीं जयंती पर उन्हें याद करते हुए श्रद्धांजलि दी।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 2, 2019
रेलवे ने अपने #MannMeinBapu के विचारों को आत्मसात किया है, तथा गंदगी और प्रदूषण से लड़ने के लिये कई कदम उठाये हैं।https://t.co/KoZBCtk3B0 pic.twitter.com/9Fr3dJtYMQआज नई दिल्ली स्टेशन पर 'स्वच्छ भारत' कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां बापू की 150वीं जयंती पर उन्हें याद करते हुए श्रद्धांजलि दी।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 2, 2019
रेलवे ने अपने #MannMeinBapu के विचारों को आत्मसात किया है, तथा गंदगी और प्रदूषण से लड़ने के लिये कई कदम उठाये हैं।https://t.co/KoZBCtk3B0 pic.twitter.com/9Fr3dJtYMQ
हेही वाचा-बुडित कर्जाचे आव्हान; २०२० पर्यंत बँकांचे ८ टक्क्यापर्यंत घसरू शकतात शेअर
दरवर्षी ८ हजारांहून अधिक रेल्वे डब्यांचे उत्पादन घेण्यात येते. येत्या काही वर्षात रेल्वे डब्यांचे उत्पादन आणखी वाढणार आहे. तसेच जैविक शौचालयाचे उत्पादन हे वाढत आहे. देशात सर्वात अधिक जैविक शौचालयाची निर्मिती करण्यात येत आहे.
हेही वाचा-सणासुदीला बँका देशभरातील २५० जिल्ह्यात भरविणार 'कर्ज मेळावे'
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेप्रमाणे रेल्वेच्या मोकळ्या जमिनीवर रुळानजीक १५० नर्सरी तयार करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. गोयल यांनी नवी दिल्ली येथील रेल्वे स्टेशनला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी प्रतिक्षागृहातील प्रवाशांबरोबर संवाद साधला.
हेही वाचा-अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी निवड