नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटने देशभरातील प्रवासी वाहनांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 66 टक्क्यांनी कमी होऊन 88,045 वाहनांची विक्री झाली आहे. ही माहिती वाहन उद्योगांची संघटना एसआयएएमने दिली आहे. एप्रिल महिन्यात एकूण 2,61,633 वाहनांची विक्री झाली होती.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्युचर्रसच्या (एसआयएएम) आकडेवारीनुसार एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात दुचाकी वाहनांच्या विक्रीत 65 टक्क्यांनी घसरून होऊन 3,52,717 दुचाकींची विक्री झाली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये 9,95,097 दुचाकींची विक्री झाली होती. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात मोटरसायकलच्या विक्रीत 56 टक्के घसरण झाली आहे. एप्रिलमध्ये 6,67,84 मोटरसायकलची विक्री झाली आहे. तर मे महिन्यात 2,95,257 मोटरसायकलची विक्री झाली आहे.
हेही वाचा- एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्क १ जानेवारीपासून वाढणार
अशी झाली वाहन विक्रीत घसरण
- स्कुटरच्या विक्रीत 83 टक्के घसरण झाली आहे. एप्रिलमध्ये 3,00,462 स्कुटरची तर मे महिन्यात 50,294 स्कुटरची विक्री झाली.
- तीन चाकी वाहनांच्या विक्रीत 91 टक्के घसरण झाल्याचे एसआयएएमच्या आकडेवारीतून दिसून आले. एप्रिलमध्ये 13,728 तीन चाकी वाहनांची तर मे महिन्यात 1,251 तीन चाकी वाहनांची विक्री झाली.
- गतवर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत यंदा मे महिन्यात वाहन विक्रीच्या सर्व श्रेणीत 65 टक्के घसरण झाली आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये 12,70,458 एकूण वाहनांची विक्री झाली होती. यंदा मे महिन्यात 4,42,013 एकूण वाहनांची विक्री झाली आहे.
हेही वाचा- कॅनरा बँकेतील विलिनीकरणानंतर सिंडिकेट बँकेच्या शाखांचे बदलणार आयएफसी कोड
टाळेबंदीचा वाहन विक्रीवर परिणाम-
एसआयएएमचे महासंचालक राजेश मेनन म्हणाले, की कोरोना महामारीमुळे अनेक राज्ये टाळेबंदीत होते. त्याचा परिणाम मे महिन्यात वाहनांच्या विक्रीवर झाला आहे. औद्योगिक ऑक्सिजन हा वैद्यकीय उपचारासाठी वळविण्यात आला होता. त्यामुळे अनेक वाहनांची उत्पादन प्रकल्प हे बंद राहिले होते. त्याचाही वाहन विक्रीवर परिणाम झाल्याचे मेनन यांनी सांगितले.