ETV Bharat / business

कृषी विद्यापीठाने 'हे' यंत्र केले विकसित, सोयाबीन उत्‍पादकांना होणार फायदा - Dr Ashok S Dhawan on farming techniques

कृषी विद्यापीठाने विकसित केलेले पाच फणी रुंद सरी वरंबा (बीबीएफ) यंत्राचे प्रात्याक्षिक पोकरा प्रकल्‍प, कृषि विभाग यांच्‍या पुढाकाराने साळापुरी येथे शेतकऱ्यांच्‍या शेतात शनिवारी दाखविण्यात आले.

कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या  बीबीएफ यंत्राची माहिती देताना कुलगरू आणि इत अधिकारी

author img

By

Published : Jun 20, 2020, 7:05 PM IST

Updated : Jun 30, 2020, 3:49 PM IST

परभणी – मराठवाडयात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र, लहरी मान्सूनमुळे शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान सहन करावे लागते. ही अडचण लक्षात घेवून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पेरणीसह फवारणी आणि रासणी यंत्र विकसीत केले आहे. हे यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केला.

कृषी विद्यापीठाने विकसित केलेले पाच फणी रुंद सरी वरंबा (बीबीएफ) यंत्राचे प्रात्याक्षिक पोकरा प्रकल्‍प, कृषि विभाग यांच्‍या पुढाकाराने साळापुरी येथे शेतकऱ्यांच्‍या शेतात शनिवारी दाखविण्यात आले. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. ढवण म्‍हणाले की, बीबीएफ यंत्र शेतक-यांना व्‍यवसायिकदृष्‍टया उपलब्‍ध करण्‍याकरिता विद्यापीठाने पुणे येथील रोहीत कृषी इंडस्ट्रिजसोबत सामंजस्‍य करार केला आहे. पुढील काही वर्षात बीबीएफ पध्‍दतीने सोयाबीन पेरणीचे क्षेत्र वाढविण्‍याचे कृषि विभाग व विद्यापीठाचे उद्दिष्‍ट आहे. तर बीबीएफ यंत्राबाबत प्रात्‍यक्षिकास कृषि अभियंता डॉ. सोळंळी यांनी माहिती दिली.

हे आहेत बीबीएफ यंत्राचे फायदे

  • यंत्राव्‍दारे पेरणी सोबतच तणनाशक फवारता येते.
  • पध्‍दतीमुळे पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते.
  • जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकाला, तसेच पुढील हंगामातील पिकांना लाभ होतो.
  • गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहुन पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. त्यामुळे बियाण्याची उगवण चांगली होते.
  • पिकांची वाढ जोमदारपणे होते. या यंत्राने चार कामे एकाच वेळेस होत असल्याने ट्रॅक्टरच्या सतत शेतामध्ये जाण्यामुळे माती दबण्याचे प्रमाण कमी होईल.

जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे यांनी शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातून हे बीबीएफ यंत्र खरेदी केल्‍यास शेतकऱ्यांचा फायदा होईल, असे सांगितले. यावेळी यंत्राने तणनाशक फवारणी, पेरणी, व रासणी करण्‍याचे प्रात्‍यक्षिक शेतकरी भागवत घाटगे यांच्‍या पाच एकर शेतात दाखविण्यात आले.

साळापुरी येथील काही निवडक शेतकऱ्यांच्‍या साधरणत: 30 एकर जमिनीवर कृषि विभागाच्‍या मदतीने पेरणी करण्‍यात येणार आहे. प्रात्‍यक्षिक पाहणी करिता गावातील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिपक नागुरे यांनी तर आभार तालुका कृषि अधिकारी पी. बी. बनसावडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी गजानन घाटगे, बाबासाहेब घाटगे व अतुल चव्‍हाण आदीसह कृषि विभाग व कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी कार्यक्रमाला विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.संतोष आळसे, बाजार समितीचे सदस्‍य गणेश घाटगे, प्राचार्य डॉ. उदय खोडके, कृषी अभियंता डॉ. स्मिता सोळंकी, सरपंच सतिश घाटगे, पंचायत समिती सदस्‍य अमोल चव्‍हाण, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे व डॉ. राहुल रामटेके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Last Updated : Jun 30, 2020, 3:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.