ETV Bharat / business

महामारीत बनावट सॅनिटायझरचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांत वाढ - counterfeit sanitisers manufacturing gangs

कोरोनाच्या महामारीत वैयक्तिक स्वच्छतेला अत्यंत महत्तव आले आहे. याचा गैरफायदा घेत सॅनिटायझरमध्ये भेसळीचे प्रकार वाढले आहेत. तर बनावट सॅनिटायझरचे उत्पादन घेण्याचे प्रकार देशाच्या अनेक भागात आढळले आहेत...

प्रतिकात्मक - सॅनिटायझर
प्रतिकात्मक - सॅनिटायझर
author img

By

Published : Aug 17, 2020, 4:43 PM IST

नवी दिल्ली – कोरोनाच्या महामारीत वैयक्तिक स्वच्छतेला अत्यंत महत्तव आले आहे. याचा गैरफायदा घेत सॅनिटायझरमध्ये भेसळीचे प्रकार वाढले आहेत. तर बनावट सॅनिटायझरचे उत्पादन घेण्याचे प्रकार देशाच्या अनेक भागात आढळले आहेत.

सरकारकडून बनावट सॅनिटायझरला आळा घालण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत नाहीत. या परिस्थितीचा फायदा घेत भेसळखोरांकडून आर्थिक फायद्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळले जात आहे. जर अमंलबजावणी केली तरच कायदा व नियम हे प्रभावी ठरू शकणार आहेत. कोणतीही विचार न करता त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालात दूध, डाळी, तेल व मसाल्यातील भेसळीला आळा घालण्यासाठी देशाच्या व्यवस्थेत व प्रशासनात त्रुटी असल्याचे नमूद केले होते. महामारीत सॅनिटायझरची मोठी मागणी वाढल्याने सरकारने 5 महिन्यांपूर्वीच किमतीवर मर्यादा घालून दिली आहे. सॅनिटायझर 200 मिली असेल तर जास्तीत जास्त 100 रुपये ग्राहकांकडून घेता येतातत. मात्र, बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या टोळ्या या नोएडा, जम्मू आणि काश्मीर, मुंबई, वडोदरा, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये कार्यरत असल्याचे उघडकीस आले होते.

छोट्या तपासामधून मोठा पर्दाफाश..

आंध्रप्रदेशमधील प्रकासम, कडप्पा आणि चित्तूर जिल्ह्यात सॅनिटायझर पिल्याने 50 मद्यपींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सॅनिटायझरमध्ये भेसळ असलेले रसायन वापरण्यात आल्याचे पोलिसांना तपासात आढळले. बनावट सॅनिटायझर तयार करण्याचा उद्योग कापड उद्योग असलेल्या हैदराबादच्या परिसरात वेगाने वाढला आहे.

समन्यवयाचा अभाव..

भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर व्यापाऱ्यांना आळा घालम्यासाठी यंत्रणेत मोठा समन्वयाचा अभाव असल्याचे मत आंध्रप्रदेशच्या उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. पैशांच्या लोभापोटी सॅनिटायझरमध्ये वापरण्यात आलेल्या मिथॅनॉलमुळे डोळ्यांना इजा होवू शकते. मज्जासंस्थेला धोका पोहोचू शकतो. तसेच श्वसनाचे रोग होवून मृत्यूही होवू शकतो. त्यांना मदत करणारे एकप्रकारे समाजाची फसवणूक करतात.

भेसळीने अनेकांच्या आरोग्याला धोका..

दुधातील भेसळीमुळे नवजात बालकांच्या वाढीवर परिणाम होतो. दुधातील भेसळीने कर्करोग व आतड्यांना अल्सर होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे बनावट सॅनिटायझरमुळे अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

जर प्रभावी यंत्रणा असेल तर भेसळखोरांना त्यांचे बेकायदेशीर व्यवसाय बंद करावे लागतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.