नवी दिल्ली - पाकिस्तानला बासमती तांदळासाठी भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळाला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये बासमती तांदळाच्या नोंदणीवरून युरोपियन युनियनमध्ये वाद सुरू आहे. अशातच
भारताने युरोपियन युनियनमध्ये बासमतीच्या तांदळाची नोंदणीसाठी प्रयत्न केला असताना पाकिस्तानने यापूर्वी विरोध केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कोणत्याही उत्पादनाची नोंद करण्यासाठी त्या देशाकडे उत्पादनाचा जीआय असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताला बासमतीच्या उत्पादनाची जागतिक पातळीवर नोंदणी करणे शक्य झाले नाही. पाकिस्तानला जीआय टॅग मिळाल्याने पाकिस्तानचा युरोपियन युनियनमधील दावा हा आणखी बळकट होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बासमतीसाठी जीआय मिळाल्याचे ट्विट करून जाहीर केले आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्पाच्या अंदाजाहून वित्तीय तुटीत १४५.८ टक्क्यांची वाढ
काय आहे जीआय टॅग?
जागतिक आरोग्य संघटनेने १९९९ साली जिओग्राफिकल इंडिकेश्न ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन कायदा केला. हा कायदा १५ सप्टेंबर २००३ पासून अंमलात आला. या कायद्यानुसार वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या सदस्य राष्ट्रांना त्यांच्या राज्यांना शेतीउत्पादनापासून ते खाद्यपदार्थांपर्यंत तसेच कलाकुसरीच्या वस्तूंपासून ते एखाद्या विशिष्ट प्रदेशातील प्राण्यांनाही हा जीआय टॅग उपलब्ध आहे. देशात २००४ साली दार्जिलिंगच्या चहापासून जीआय टॅग देण्याची परंपरा सुरू झाली होती. यानंतर, महाराष्ट्रात सोलापूरची चादर, पुणेरी पगडी, कोल्हापूरी चप्पल, नागपूरची संत्री इत्यादी गोष्टींना जीआय टॅग मिळाला आहे.
हेही वाचा-'स्पूटनिक व्ही' मार्चमध्ये लाँच करण्याचा डॉ. रेड्डीजचा प्रयत्न