नवी दिल्ली - आयआरटीसी संचलित लखनौ ते नवी दिल्ली धावणारी तेजस एक्सप्रेसची बुकिंग फुल झाली आहे. सुमारे 2 हजारांहून अधिक प्रवाशांनी दिवाळी सणाच्या तोंडावर बुकिंग केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पहिल्यांदाच या रेल्वेची सेवा रेल्वेची उपकंपनी आयआरसीटीसीकडून देण्यात आली आहे.
तेजस रेल्वे लखनौ ते दिल्ली आणि दिल्ली ते लखनौ अशी सुरू झाली आहे. लखनौ ते दिल्ली रेल्वेसाठी रविवारी सायंकाळी 749 बुकिंग करण्यात आल्या आहेत. तर परतीच्या प्रवासासाठी 20 नोव्हेंबरपर्यंत 1,549 बुकिंग करण्यात आल्या आहेत. दिवाळी असल्याने 23ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरपर्यंत सर्वात जास्त बुकिंग करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. काही मार्गावर रेल्वे खासगीकरण असून त्यादृष्टीने हे पहिले पाऊल आहे. रेल्वेने 100 दिवसीय मोहिमेंतर्गत प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-शेअर बाजाराची १३०० अंशाची उसळी; निर्देशांकाने गाठली पुन्हा ३९,००० ची पातळी
प्रवाशांना खाण्यासाठी हे असतील पर्याय!
प्रवाशांना पहिल्यांदा कॉम्बो मिल निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये एसी चेअर कारसाठी 185 रुपये तर एक्झ्युटीव्ह चेअर कारसाठी 245 रुपये आकारण्यात येत आहेत. दिल्ली ते लखनौ प्रवासासाठी 340 रुपये आणि 385 रुपये आकारण्यात येणार आहेत. यामध्ये बिस्किटासह देण्यात येणारा चहा अथवा कॉफीचा समावेश आहे. दुसरा पर्याय म्हणून एक्झ्युटिव्ह क्लासमध्ये लिंबूपाणी व सुंगधित लशीची निवड प्रवाशांना करण्यात येणार आहे.
हेही वाचा-आठवडाभरात पेट्रोल १.६० रुपयाने महागले! सलग सातव्या दिवशी दरवाढ सुरूच
नाष्त्यासाठी प्रवांशाना पोहे घेता येणार आहेत. तर दुसऱ्या कोम्बोमध्ये उत्तपा घेता येणार आहे. याशिवय मेदूवडा आणि उपमाचाही पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहे. मासांहरींसाठी मसाला आम्लेट घेता येणार आहे. प्रवाशांना टॉमेटो केचअप, चहा कीट, मीठ व मुखवास अतिरिक्त मागवू शकणार आहेत. प्रवास संपण्यापूर्वी प्रवाशांना चहा किंवा कॉफीसह लहान समोसा देण्यात येणार आहे. तेजस एक्सप्रेस ही 5 ऑक्टोबरपासून व्यावसायिकदृष्ट्या प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.
हेही वाचा-शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदार 'मालामाल '; दोन दिवसात 10.50 लाख कोटींची संपत्ती भर