नवी दिल्ली – देशातील महागाई खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आहे. देशातील महागाई जवळपास शून्य असल्याचा दावा पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनी केला. ते 'इंडिया ग्लोबल वीक 2020' च्या व्हर्च्युअल फोरममध्ये बोलत होते.
देशात विदेशी चलनाचा साठा हा जवळपास पन्नास हजार कोटी डॉलर आहे. भारतावरील 1991 च्या आर्थिक संकटावर बोलताना संन्याल म्हणाले, की 1919 मध्ये अर्थव्यवस्थेचे नियंत्रण सुटले होते. सध्या, तशी स्थिती नाही. देशात महागाई नियंत्रणात आहे.
अर्थव्यवस्थेचा काही भाग स्थिर आहे. केंद्र सरकार आणि राज्यांना त्यांच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात काम करण्यासारखे आहे. आम्ही सूचना घेण्यासाठी खुले आहोत. कोरोनाच्या संकटामुळे फटका बसलेल्या लघू उद्योगांना दिलासा देण्यासाठी सरकारने योजना जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.
इंडिया ग्लोबल वीकच्या कार्यक्रमात 30 देशांमधून 500 जणांनी सहभाग घेतला. तर 250 जागतिक वक्त्यांनी 75 कार्यक्रमांतून संवाद साधला.
असे आहे देशातील महागाईचे चित्र-
सरकारी आकडेवारीनुसार घाऊक बाजारपेठेतील महागाई मे महिन्यात घसरल्याचे समोर आले आहे. वार्षिक महागाईवर आधारित मे महिन्यात घाऊक किंमत (होलसेल प्राईज इंडेक्स) निर्देशांक 3.21 टक्क्यांनी घसरला आहे. गतवर्षी मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक 2.79 टक्के होता. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने त्रस्त झालेल्या माल वाहतूकदार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता.