ETV Bharat / business

कांदे भाववाढीवरून विरोधक आक्रमक; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?

author img

By

Published : Dec 6, 2019, 1:11 PM IST

Updated : Dec 6, 2019, 2:00 PM IST

कांदे दरवाढीच्या समस्येवरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Opposition slammed gov on onion rate issue
संपादित - कांदे भाववाढीवर विरोधक आक्रमक

नवी दिल्ली - देशभरात कांद्याचा भाव प्रति किलो १०० रुपये प्रति किलोहून अधिक झाले आहेत. या भाववाढीबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला. सरकारने कांदे भाववाढ नियंत्रण करण्यासाठी पुरेसे पावले उचलले नसल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे.

राहुल गांधी-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपण कांदा फारसा खात नसल्याचे म्हटले होते. याचा संदर्भ घेत राहुल गांधी म्हटले, अर्थमंत्र्यांना काय खात आहात, असा कुणी प्रश्न विचारला नाही. अर्थव्यवस्थेला संघर्ष का करावा लागत, हे लोकांना जाणून घ्यायचे आहे, असे गांधी म्हणाले. तुम्ही अत्यंत गरीब व्यक्तीलाहा प्रश्न विचारला, तरी तुम्हाला जबाबदार उत्तर मिळेल, अशी घणाघाटी टीका गांधींनी केली. ते काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते.

पी. चिदंबरम-
ते एवोकाडो हे फळ खातात का? अशा शब्दात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी यांनी सीतारामन यांच्यावर टीका केली. ते संसदेला येत असताना माध्यमांशी बोलत होते. ते तिहार तुरुगांत १०६ दिवस कैद होते. त्यांना सीतारामन यांच्या कांद्यावरील अजब विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली होती. अर्थंमंत्र्यांनी कांदा खात नसल्याचे संसदेमध्ये म्हटले. ते काय खातात? ते एवोकोडो हे फळ खातात का?

हेही वाचा- अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी - सुनील तटकरे

आझम खान-
समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर उपहासात्मक टीका केली. ते म्हणाले, कांदे खाणे बंद करा. ते खाणे बंधनकारक आहे का? आमचे जैन बंधू खात नाहीत. कांदे, लसूण व मांस खाणे बंद करा. त्यामुळे सर्व काही वाचू शकणार आहे. जर त्यांच्याकडे ब्रेड नसेल तर त्यांना केक खावू द्या, असे एका राणीने म्हटलेच होते, असेही खान म्हणाले.

सुदिप बंडोपध्याय-
कांद्याची साठेबाजीवर रोखण्यावर केंद्रांनी राज्यांना सूचना करावी, अशी तृणमुल काँग्रेस पक्षाचे सुदिप बंडोपध्याय यांनी मागणी केली. हे सरकारचे अपयश आहे. वाढणाऱ्या किमती आटोक्याबाहेर जात आहेत. याचा आम्ही सर्व निषेध करत आहोत. साठेबाजीमुळे कांद्याचे दर वाढत आहेत. अंमलबजावणी विभागांनी त्याबाबत तपासणी करावी, अशी त्यांनी मागणी केली. तसेच दरवाढीवर देखरेख ठेवणारा विभाग अधिक सक्रिय असावा, अशीही त्यांनी मागणी केली.

हेही वाचा-विमान इंधनांसह नैसर्गिक वायू जीएसटीच्या कक्षेत येण्याची शक्यता; धर्मेंद्र प्रधानांचे संकेत

काय म्हणाल्या होत्या निर्मला सीतारामन ?
देशात कांद्याचे भाव वाढत होत असताना एका खासदारांनी निर्मला सीतारामन यांना तुम्ही कांदा खाता का, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना सीतारामन यांनी जिथे कांदा व लसूण कमी खाल्ला जातो, अशा कुटुंबातून असल्याचे सांगितले. त्यावेळी सीतारामन यांनी कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
Last Updated : Dec 6, 2019, 2:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.