नवी दिल्ली - कांद्याच्या किमती राजधानीमधील घाऊक बाजारात प्रति किलो ५ रुपयांनी कमी झाले आहेत. आयातीसह स्थानिक उत्पादकांकडून घाऊक बाजारपेठेत कांद्याची मोठी आवक झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले आहेत.
आझादपूर भाजीमंडई २४ हजार कांद्याच्या पोत्यांची आवक झाली आहे. यामधील प्रत्येक पोत्यात सुमारे ५५ किलो कांदा असल्याची माहिती कांदे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांनी दिली. सुमारे २०० टन आयातीचा कांदा सोमवारी भाजीमंडईमध्ये आला. घाऊक बाजारात कांद्याचा भाव प्रति किलो हा ५० ते ७५ रुपये किलो राहिला. हा भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५ रुपयाने कमी असल्याचे सूत्राने सांगितले. अफगाणिस्तान आणि तुर्कीमधील कांद्याची बाजारपेठेत आवक झाली आहे.
हेही वाचा-सोलापूर बाजार समितीत दीड लाख क्विंटल कांद्याची विक्री; ५ दिवसात कोट्यवधीची उलाढाल
गेल्या दोन दिवसात अफगाणिस्तानमधील ८० ट्रक कांद्याची बाजारात आवक झाली आहे. पंजाबच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात अफगाणी कांदा पाठविला जात असल्याचे सूत्राने सांगितले. आझादपूर भाजीमंडई ही देशातील सर्वात मोठी भाजीपाल्याची मंडई आहे.
हेही वाचा-काद्यांने केला वांदा! केंद्रीय मंत्री रामविलास पासवानविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल
दरम्यान, मागील पाच दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगला भाव मिळत असल्यामुळे कांद्याची आवक वाढली. त्यामुळे ७१ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे.