ETV Bharat / business

ओला जुलैमध्ये ई-स्कूटर करणार लाँच; 400 शहरांत 1 लाख चार्जिंग पॉईंटचे उद्दिष्ट - Hypercharger Network

गतवर्षी ओलाने तामिळनाडूमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या कारखान्यासाठी 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. या कारखान्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 10,000 नोकऱ्या तरुणांना मिळू शकणार आहेत.

Ola
ओला
author img

By

Published : Apr 22, 2021, 4:27 PM IST

नवी दिल्ली - ओला इलेक्ट्रिक कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत जुलैमध्ये लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी कंपनीकडून हायपरचार्जर नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. या नेटवर्कमध्ये देशातील 400 शहरांमध्ये 1 लाख चार्जिंक पॉईंट सुरू करण्यात येणार आहे.

गतवर्षी ओलाने तामिळनाडूमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या कारखान्यासाठी 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. या कारखान्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 10,000 नोकऱ्या तरुणांना मिळू शकणार आहेत. तर हा कारखाना जगातील सर्वात मोठा स्कूटरची निर्मिती करणारा कारखाना असणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कारखान्यामधून वार्षिक 20 लाख स्कूटरची निर्मिती होऊ शकणार आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सॅनिटायझरसह स्वच्छता उत्पादनांच्या मागणीत वाढ

18 मिनिटात 50 टक्के रिचार्ज-

ओलाचे चेअरमन तथा सीईओ भाविष अग्रवाल म्हणाले, की येत्या 12 महिन्यात कारखान्याची उत्पादन क्षमता वाढविणार आहोत. तसेच त्याचवेळी विक्री सुरू होणार आहे. कारखान्याचे काम जुनमध्ये झाल्यानंतर जुलैला विक्री सुरू होईल, असेही अग्रवाल यांनी सांगितले. ओलाने शाश्वत, सहज मिळू शकणारे आणि भविष्यात जोडणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने अद्याप ई-स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही. ओलाची ई-स्कूटर ही 18 मिनिटात 50 टक्के रिचार्ज होते. तर 75 किलोमीटर स्कूटर धावू शकते.

हेही वाचा-कोव्हिशिल्डच्या उत्पादनाकरिता सीरमने बँकांकडून घेतले कर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.