वॉशिंग्टन - चीनबरोबरचा व्यापारी करार ऐतिहासिक म्हणणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या संकटात भूमिका बदलली आहे. चीनबरोबरच्या व्यापारी कराराबाबत वेगळा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. ते व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलत होते.
बीजिंगच्या नेतृत्वाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली. चीनने कोरोना विषाणू जगभरात पसरू दिला, असा त्यांनी आरोप केला. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, की आपण सर्वजण पाहत आहोत, काय घडत आहे. सध्याची स्थिती खूप निराशाजनक आहे. चीनमधून कोरोना जगभरता पसरला. ते थांबवू शकले असते. चीनबरोबर करार करताना खूप उत्साहित होतो, असेही त्यांनी सांगितले. पुढील वर्षात अमेरिकेची अर्थव्यवस्था रुळावर येईल, असा त्यांनी नुकताच विश्वास व्यक्त केला होता.
हेही वाचा-'ही' कंपनी कोरोनाच्या लढ्याकरता भारताला देणार ११.५ कोटी रुपये
सलग २२ महिने चालले होते व्यापार युद्ध-
अमेरिका आणि चीनमध्ये २२ महिने व्यापार युद्ध सुरू होते. या व्यापारी युद्धात 'जशास तसे' या तत्वाने दोन्ही देशांनी परस्पर देशांच्या उत्पादनांवर आयात शुल्क लादले होते. त्यानंतर जानेवारीत अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी करार अस्तित्वात आला. या करारानुसार चीनने अमेरिकेकडून अतिरिक्त २०० अब्ज रुपयांची उत्पादने २०२०-२१ मध्ये खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
हेही वाचा-फेसबुकसह इन्स्टाग्रामवर ऑनलाईन शॉप सुरू करण्याची मिळणार सुविधा
दरम्यान, मंगळवारीपर्यंत ९२ हजार नागरिकांचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. तर १५ लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे.