ETV Bharat / business

ग्राहकांची आर्थिक माहिती लिक नाही; डोमिनोझ इंडियाचा खुलासा

ज्युबिलियंट फुडवर्क्सच्या प्रवक्त्याने म्हटले, की कोणत्याही ग्राहकाची आर्थिक माहिती घेण्यात आलेली नाही. त्याचा कामकाजासह व्यवसायावर कोणताही परिणाम झाला नाही. तज्ज्ञांकडून प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहितीही प्रवक्त्याने दिली आहे.

Dominos Pizza
डोमिनोझ इंडिया
author img

By

Published : Apr 20, 2021, 8:50 PM IST

नवी दिल्ली - डोमिनोझ पिझ्झाची भारतामध्ये मास्टर फ्रँचाईजी असलेल्या ज्युबिलियंट फुडवर्क्सने ग्राहकांचा आर्थिक डाटा लिक झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. डोमिनोझ पिझ्झाच्या ग्राहकांची आर्थिक माहिती डार्कवेबवर उपलब्ध असल्याचा दावा सायबर सिक्युरिटी फर्मने केला होता.

ज्युबिलियंट फुडवर्क्सच्या प्रवक्त्याने म्हटले, की कोणत्याही ग्राहकाची आर्थिक माहिती घेण्यात आलेली नाही. त्याचा कामकाजासह व्यवसायावर कोणताही परिणाम झाला नाही. तज्ज्ञांकडून प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहितीही प्रवक्त्याने दिली आहे. योग्य ती पावले उचलण्यात आली आहे. आर्थिक डाटा लिक झाल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. आघाडीच्या सायबर सिक्युरिटी रिसर्चच्या माहितीनुसार डार्कवेबवर कोणताही आर्थिक डाटा नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या धोरणाप्रमाणे आम्ही क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणतीही आर्थिक माहितीचे जतन करत नाही. त्यामुळे ही माहिती जाहीर होऊ शकत नाही.

हेही वाचा-बजाज ऑटोची पल्सर एनएस १२५ लाँच, जाणून घ्या किंमत

काय आहे डाटा लिक होण्याचे प्रकरण-

डोमिनोझ पिझ्झाच्या भारतामधील १० लाख ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची माहिती डार्ग वेबवर 4 कोटी रुपयांना विकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा सायबर सिक्युरिटीचे सीटीओ अॅलोन गॅल यांनी केला आहे. डोमिनोझ पिझ्झामधील 18,00,00,000 ऑर्डरची माहिती, त्यामधील नावे, फोन, ईमेल, पत्ते आणि आर्थिक माहिती जाहीर झाल्याचे गॅल यांनी ट्विटमध्ये होते. तसेच त्यामध्ये 1,000,000 क्रेडिट कार्डची माहिती असल्याचे म्हटले होते. मोठ्या प्रमाणात भारतीयांचा डाटा लिक होणे ही चिंताजनक बाब असल्याचेही गॅल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-रिलायन्सचा संकटात मदतीचा हात; रोज ७०० टन ऑक्सिजनचे राज्यांना मोफत वाटप

यापूर्वीही भारतीय कंपन्यांवर डाटा चोरण्यासाटी हॅकिंगचे हल्ले-

हॅकिंगचा हल्ला होईल, असा इशारा 5 मार्चला भारतीय नॅशनल सायबर डिफेन्स एजन्सीला (सीईआरटी-इन) देण्यात आल्याची माहिती सायबर सिक्युरिटी संशोधक राजशेखर राजहरिया यांनी दिली होती. यापूर्वी बिगबास्केट, बायकॉईन, जस्टपे आणि अपस्टॉक्समधील वापरकर्त्यांचा डाटा हॅक झाल्याचे प्रकार घडले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.