नवी दिल्ली - वृत्तवाहिन्याच्या संघटनेच्या (न्यूज ब्रॉडकास्ट फेडरेशन) कार्यकारी सदस्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. संघटनेच्या सदस्यांनी वृत्तवाहिन्यांना वृत्तपत्र उद्योगाप्रमाणे वस्तू व सेवा कर लागू करावा, अशी संघटनेने मागणी केली.
सध्या, वृत्तपत्र उद्योगावर ५ टक्के वस्तू व सेवा कर लागू करण्यात येतो. तर प्रसारण वाहिन्यांवर १८ टक्के वस्तू व सेवा कर लागू करण्यात येतो. वृत्तवाहिन्याच्या संघटनेचे (एनबीएफ) अध्यक्ष अर्णब गोस्वामी म्हणाले, देशातील वृत्तवाहिन्यांना महत्त्व देण्याची गरज आहे.
हेही वाचा-चालू वर्षात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता, कारण...
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी एनबीएफच्या शिफारसीचे पत्र स्वीकारले आहे. त्यामध्ये लक्ष घालण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष जगी एम. पंडा, संजीव नरेन आणि महासचिव आर. जय कृष्णा हे उपस्थित होते.