नवी दिल्ली - रामायणाची संकल्पना असलेले इंटिरिअर आणि सुरू असलेले भजन...असा अध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी रेल्वे प्रवाशांना देणार आहे. ही रामायण एक्सप्रेस रामाशी निगडित असलेल्या तीर्थस्थळांवरून धावणार आहे. या रेल्वेमुळे प्रवाशांना चाकावर मंदिर असल्याचा अनुभव येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रामायण एक्सप्रेस ही १० मार्चनंतर लाँच होणार असल्याचे रेल्वे मंडळाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी सांगितले. येत्या आठवड्यात रामायण एक्सप्रेसचे वार्षिक वेळापत्रक जाहीर होणार आहे. ही रेल्वे दक्षिण, उत्तर, पूर्व आणि पश्चिमेमधून धावणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील प्रवाशांना सेवा मिळू शकणार आहे. रेल्वेचे बाह्य आणि आंतररचना ही रामायणाच्या संकल्पनेवर आधारित आहे.
हेही वाचा-व्हॅलेन्टाईन डे'ला दिल्ली विमानतळ इंडिगोच्या प्रेमात; गमतीशीर ट्विट्ने उडविली धमालहेही वाचा-
पौराणिक पात्रांशी निगडित असलेल्या स्थळावरून रेल्वे जाणार आहे. यापूर्वी श्री रामायण एक्सप्रेस ही रेल्वे लाँच करण्यात आली आहे. यामध्ये ८०० प्रवासी प्रवास करू शकतात. ही सेवा १४ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. यामध्ये नंदीग्राम, सीतामर्ढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, नाशिक, हम्पी, अयोध्या, रामेश्वरम अशा ठिकाणावरून जाते.
हेही वाचा-फ्लिपकार्टसह अॅमेझॉनच्या चौकशीला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती