ETV Bharat / business

आनंदाची वार्ता ! 'या' तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांचे होवू शकते उत्पन्न दुप्पट - Aquaculture System

शेतीच्या पद्धतीत सुधारणा केल्यासच शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होवू शकते, असे एनआयआरडीपीआरचे संचालक डब्ल्यू.आर.रेड्डी यांनी म्हटले. तंत्रज्ञान असलेल्या शेतीमधील उपायामधून तरुणांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे, असा रेड्डी यांनी विश्वास व्यक्त केला. ग्रामीण तंत्रज्ञान वसाहतमध्ये (रुरल टेक्नॉलॉजी पार्क) मत्स्यशेतीच्या यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

संग्रहित - शेती
author img

By

Published : Jul 8, 2019, 5:04 PM IST

हैदराबाद - शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केले आहे. प्रत्यक्षात नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शक्य असल्याचा दावा एनआयआरडीपीआर संस्थेने केला आहे. त्यासाठी 'राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था आणि पंचायती राज'ने मत्स्यशेतीसाठी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

एनआयआरडीपीआरमध्ये कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मदतीने बॅकयार्ड रि-सर्क्युलेटरी मत्स्यशेतीची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यामध्ये जलाशयातील कमी पाण्यात जास्तीत जास्त मत्स्यशेती करणे शक्य होते. जास्त घनतेने म्हणजे अधिक प्रमाणात मासे ठेवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना व्यवस्थापन करणे सहजशक्य होते.

शेतीच्या पद्धतीत सुधारणा केल्यासच शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होवू शकते, असे एनआयआरडीपीआरचे संचालक डब्ल्यू.आर.रेड्डी यांनी म्हटले. तंत्रज्ञान असलेल्या शेतीमधील उपायामधून तरुणांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे, असा रेड्डी यांनी विश्वास व्यक्त केला. ग्रामीण तंत्रज्ञान वसाहतमध्ये (रुरल टेक्नॉलॉजी पार्क) मत्स्यशेतीच्या यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय मत्स्योद्योग विकास मंडळ या सरकारी संस्थेने अर्थसहाय्य केले आहे.

असा होतो आर्थिक फायदा-

या यंत्रणेच्या मदतीने तिलॅपिया, पँगासिउसस, मुर्रेल आणि पर्लस्पॉट या माशांच्या प्रजातींची मत्स्यशेती करता येते. जनुकीय विकास केलेल्या फार्म टिलॅपियामधून १२० दिवसामध्ये चांगला आर्थिक फायदा होतो. त्यापासून साधारणत: मासिक २५ हजार ७५० रुपये मिळतात. हे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादनाचे स्त्रोत ठरू शकते. विशेष म्हणजे कमी प्रमाणात पाण्यातून दुप्पट उत्पन्न मिळणे शक्य होते. मत्स्यशेती केलेला चिखल हा पीकवाढीसाठी खत म्हणून वापरता येते. त्यामुळे रासायनिक खतांसाठी खर्च होणाऱ्या पैशांची बचत होते.

एनआयआरडीपीआर देणार प्रशिक्षण-

एनआयआरडीपीआरमध्ये ग्रामीण तंत्रज्ञाना वसाहतीत संपूर्ण व्यवस्था कशी चालते, याचे प्रात्याक्षिक दाखविले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण, स्वयंसहाय्य बचत गट (एसएचजीएस) आणि मत्स्यशेतीतून उत्पन्न वाढविण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना देण्यात येणार आहे. एकंदरीत मत्स्यशेती हा केवळ समुद्रकिनारी भागापुरता व्यवसाय राहिलेला नाही. फक्त त्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून घेणे गरजेचे आहे, असे म्हणायला हरकत नाही.

Intro:Body:

Biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.