मुंबई - तुम्ही आर्थिक व्यवहारासाठी एनईएफटी वापरत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) ही देयक व्यवहार व्यवस्था २२ मे रोजी मध्यरात्री ते २३ मे रोजी दुपारपर्यंत बंद राहणार आहे. ही माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे.
एनईएफटीमध्ये तांत्रिक व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी एनईएफटीची सेवा काही काळ बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. एनईएफटीमध्ये तांत्रिक सुधारणा आणि बळकटीकरणासाठी तंत्रज्ञानाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे २२ मे रोजी रात्री १२ वाजून १ मिनिटापासून २३ मे रोजी दुपारी २ वजापेपर्यंत एनईएफटी सेवा बंद टेवण्यात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. असे असले तरी आरटीजीएस ही देयक व्यवस्था सुरुच राहणार आहे.
हेही वाचा-गोव्यात 24 तासांपासून वीजपुरवठा खंडित; अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांकडून मदतकार्य सुरु
एप्रिलमध्येही आरबीआयने ठेवली होती एनईएफटीची सेवा बंद
यापूर्वी आरबीआयने एनईएफटीमध्ये तंत्रज्ञान अद्यायवत करण्यासाठी एप्रिलमध्ये अशाच पद्धतीने सेवा बंद ठेवली होती. एनईएफटीवरून पैसे हस्तांतरण करण्यासाठी तासांहून अधिक अवधी लागतो. तर आरटीजीएसमधून तत्काळ पैसे पाठविले जातात. आरटीजीएसची सुविधा ही गतवर्षी १४ डिसेंबरपासून २४ तास करण्यात आली आहे. जगभरातील मोजक्याच देशांमध्ये आरटीजीएस सेवा ही २४X७ उपलब्ध आहे.
हेही वाचा-पुण्यात पाण्याचा टँकर पुरवण्याच्या वादातून तरुणाचा खून