नवी दिल्ली - केंद्र सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट (एनआयएफएम) फरिदाबाद संस्थेचे नाव बदलण्यात येणार आहे. या संस्थेचे नाव अरुण जेटली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट (एजेएनआयएफएम) असे नाव असणार आहे.
एनआयएफएम, फरिदाबाद ही १९९३ मध्ये अर्थमंत्रालयाच्या वित्तव्यय विभागांतर्गत स्थापन झाली आहे. या संस्थेमधून वित्त खात्यामधील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. एनआयएफएम सोसायटीचे अध्यक्षपद हे केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे असते.
केंद्र सरकारच्या वरिष्ठ आणि मध्यम पातळीवरील व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांसाठी माहिती केंद्र झाले आहे. यामध्ये वित्तीय व्यवस्थापन, सार्वजनिक खरेदी आणि सार्वजनिक धोरण यावर प्रशिक्षण देण्यात येते.
चिकन खाणे सुरक्षित, कोरोनाचा संसर्ग होत नाही- केंद्र सरकार
एनआयएफएमकडून राज्य सरकारचे अधिकारी, संरक्षणमधील आस्थापना, बँक, वित्तीय संस्था आणि सार्वजनिक कंपन्यांना मदत केली जाते. संस्थेत व्यवस्थापनाच्या शिक्षणाव्यतिरिक्त आणि एआयसीटीई मान्यताप्राप्त व्यवस्थापनाचे पदवीत्युत्तर पदविका असे विविध कोर्स घेतले जातात. माजी केंद्रीय अर्थमंत्री व पद्मभूषण विजेते अरुण जेटली यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून २६ मे २०१४ ते ३० मे २०१९ पर्यंत पदभार सांभाळला आहे. संस्थेसाठी दाखविलेली दूरदृष्टी आणि योगदान लक्षात घेता सरकारने अरुण जेटली यांचे नाव संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-सीसीआयच्या चौकशीविरोधात अॅमेझॉनची कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका