ETV Bharat / business

अच्छे दिन संपले ? मोबाईल इंटरनेटसह कॉलिंगचे दर ५० टक्क्यापर्यंत महागणार - मोबाईल कॉलिंग

दूरसंचार कंपन्यांमधील तीव्र स्पर्धेमुळे गेल्या पाच वर्षात मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेटचे दर वाढले नव्हते.  २०१४ नंतर ग्राहकांना कॉलिंगचा दर जवळपास शून्य आहे. तर इंटरनेटच्या वापराचा दर २०१४ पासून ९५ टक्क्यांनी घसरला. २०१४ मध्ये एक जीबीसाठी २६९ रुपये मोजावे लागत होते. त्यासाठी ग्राहकाला सध्या ११ रुपये ७८ पैसे मोजावे लागतात.

Recharge rate hike
रिचार्ज दरवाढ
author img

By

Published : Dec 2, 2019, 7:20 AM IST

नवी दिल्ली - मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेटचे दर वाढणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला उद्यापासून कात्री लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोबाईलच्या वापराचा येणारा स्वस्ताईचा अनुभव संपणार आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन आयडियाने रिचार्जचे दर ५० टक्क्यापर्यंत वाढविण्याचे जाहीर केले आहे. तर रिलायन्स जिओने रिचार्जचे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे रविवारी जाहीर केले.

दूरसंचार कंपन्यांमधील तीव्र स्पर्धेमुळे गेल्या पाच वर्षात मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेटचे दर वाढले नव्हते. २०१४ नंतर ग्राहकांना कॉलिंगचा दर जवळपास शून्य आहे. तर इंटरनेटच्या वापराचा दर २०१४ पासून ९५ टक्क्यांनी घसरला. २०१४ मध्ये एक जीबीसाठी २६९ रुपये मोजावे लागत होते. त्यासाठी ग्राहकाला सध्या ११ रुपये ७८ पैसे मोजावे लागतात. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयिडियाने त्यांनी अमर्यादित श्रेणीतील नवे दर जाहीर केले आहेत. हे दर पूर्वीच्या प्रिपेड प्लॅनहून ५० टक्क्यापर्यंत अधिक आहेत. नवीन दर उद्यापासून लागू होणार आहेत. तर रिलायन्सने अर्मायिदत कॉलिंग आणि डाटाचे दर ४० टक्क्यापर्यंत वाढविले आहेत. हे नवे दर ६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

सर्वात प्रथम व्होडाफोन आयडियाने प्रिपेड उत्पादने आणि सेवांचे दर वाढविले. त्यापाठोपाठ भारती एअरटेलने प्रिपेड सेवांचे दर वाढविले आहेत. त्यामुळे भारती एअरटेल व व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना कॉलिंग करणे व इंटरनेट चार आठवडे चालू ठेवण्याकरिता किमान ४९ रुपयांचा प्रिपेड बॅलन्स असावा लागणार आहे. जिओनेही दर वाढविले आहे. मात्र, त्याचा ग्राहकांना ३०० पट फायदा होणार असल्याचा जिओने दावा केला आहे.

हेही वाचा-मोबाईल इंटरनेटसह कॉलिंग महागले! जिओकडून रिचार्जच्या दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ

...तर आउटगोईंगसाठी मोजावे लागणार पैसे
व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलकडून अर्मयादित आउटगोईंगची सुविधा देण्यात येत होती. यावर ३ डिसेंबरपासून मर्यादा घालण्यात येणार आहे. दोन्ही कंपन्यांनी २८ दिवसांच्या वैधतेसाठी प्लॅन असेल तर दुसऱ्या नेटवर्कवरील कॉलसाठी १ हजार मिनिटांची मर्यादा निश्चित केली आहे. तर ८४ दिवसांच्या वैधतेचा प्लॅन असेल तर दुसऱ्या नेटवर्कवरील कॉलसाठी ३ हजार मिनिटांची मर्यादा घातलेली आहे. याचा अर्थ मर्यादेहून अधिक मिनिटे कॉलिंग केल्यास ग्राहकांना प्रति मिनिटे ६ पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. तर जिओने इतर नेटवर्कसाठी योग्य दर असणार असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी दूरसंचार कंपन्यांनी रिचार्जचे दर २०१४ मध्ये वाढविले होते.

हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे थकित रक्कम भरा; सरकारची दूरसंचार कंपन्यांना नोटीस

यामुळे दूरसंचार कंपन्यांनी वाढविले दर-

सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना थकित भाडे केंद्रीय दूरसंचार विभागाला देण्याचे २४ ऑक्टोबरला आदेश दिले. त्यामुळे व्होडाफोनने मागील तिमाहीत ५० हजार ९२१ कोटींचा तोटा नोंदविला आहे. हा आजपर्यंतचा सर्वात अधिक भारतीय कंपनीने तिमाहीत नोंदविलेला तोटा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्होडाफोन आयडियाला ४४ हजार १५० कोटी रुपये दूरसंचार विभागाला द्यावे लागणार आहेत. आर्थिक संकटात सापडल्याने व्होडाफोन आयडियाने मोबाईल कॉलिंग आणि डाटाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा-भारतीय कंपन्यांमध्ये व्होडाफोन आयडियाला तिमाहीत सर्वाधिक तोटा

भारती एअरटेललाही दुसऱ्या तिमाहीत २३ हजार ४५ कोटींचा तोटा झाला. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारती एअरटेलला ३५ हजार ५८६ कोटी दूरसंचार विभागाला द्यावे लागणार आहेत. दूरसंचार क्षेत्र अडचणीत सापडल्याने केंद्र सरकारने थकित रकमेवर व्याज अथवा दंड लागू करण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.