सॅनफ्रान्सिस्को- व्हिन्डोजचे नवे व्हर्जन हे २४ जूनला लाँच होणार आहे. त्यापूर्वी व्हिन्डोज १० चा सपोर्ट हा कंपनीकडून ऑक्टोबर २०२५ ला बंद होणार आहे.
मायक्रोसॉफ्टने सपोर्ट पेजमध्ये नवीन व्हिन्डोजच्या लाँचिंगबाबत माहिती दिली आहे. माइक्रोसॉफ्ट 24 जूनला व्हिन्डोज 11 कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. त्याबाबत कंपनीने युट्यूबवर ११ मिनिटाची माहिती दिली आहे. कार्यक्रमात मायक्रोसॉफ्टकडून नवीन व्हर्जनच्या फीचरची माहिती दिली जाणार आहे.
हेही वाचा-नाशिक : पाकच्या कांद्याने केला भारतीय कांद्याचा 'वांदा'; निर्यातीत 70 टक्के घट
व्हिन्डोज 10 चा सपोर्ट होणार बंद
मायक्रोसॉफ्टकडून 10 अक्टूबर 2025 ला व्हिन्डोज 10 होम, प्रो, , प्रो फॉर वर्कस्टेशन्स आणि प्रो एज्यूकेशनचा सपोर्ट बंद केला जाणार आहे. मायक्रोसॉफ्टने नुकतेच व्हिन्डोज 10 एक्सचे लाँचिंग रद्द केले आहे. व्हिन्डोज 10 एक्स हे ड्यूल स्क्रीन डिव्हाईस होते.
हेही वाचा-सोने-चांदी खरेदी करणार आहात... थांबा!!! जाणून घ्या नवीन नियम, कायदे... त्यांचे फायदे
नव्या व्हिन्डोजमध्ये डेव्हलपरला मोठी आर्थिक संधी
नुकतेच मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला म्हणाले, की व्हिन्डोजच्या सर्वात महत्त्याच्या अपडेटची माहिती लवकरच जाहीर करणार आहोत. ही डेव्हलपर आणि क्रिएटरला मोठी आर्थिक संधी असणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवीन व्हिन्डोजची चाचणी स्वत: घेत असल्याचेही नाडेला यांनी सांगितले होते.
दरम्यान, व्हिन्डोजच्या नव्या व्हर्जनमध्ये डेव्हलपरला आर्थिक संधी असल्याचे नाडेला यांनी सांगितल्याने थर्ड पार्टी अॅपला मायक्रोसॉफ्ट परवानगी देईल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.