हैदराबाद - कोविड-19 च्या साथीच्या दरम्यान डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जेवढी गती आलेली पाहायला मिळाली, तेवढी याआधी कधीही आली नव्हती. दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट येत्या पाच वर्षांत 50 कोटींहूनही अधिक नवीन अॅप्स विकसित करण्याची शक्यता आहे.
सध्याच्या साथीच्या काळात प्रत्येक व्यवसाय, संस्था तंत्रज्ञान युनिटमध्ये बदलत आहे. म्हणूनच, जगात अधिकाधिक नवीन अॅप्स विकसित होणे अपेक्षित आहे. मायक्रोसॉफ्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सोढी म्हणाले की, बहुतेक अॅप्स 'लो कोड प्लॅटफॉर्म'वर विकसित करणे अपेक्षित आहे.
हेही वाचा - चिनी वस्तूंवर बहिष्कारानंतर दिवाळीत 72 हजार कोटींची उलाढाल
सोढी यांनी 'डिकोडिंग मायक्रोसॉफ्ट बिझिनेस अॅप्लिकेशन' वर झालेल्या एका व्हर्च्युअल राउंडटेबल चर्चेदरम्यान संपूर्ण भारतात मायक्रोसॉफ्टच्या 'डायनॅमिक्स 365 प्रोजेक्ट ऑपरेशन्स' सोल्यूशनच्या उपलब्धतेची घोषणा करताना ही माहिती दिली.
'तंत्रज्ञान वर्षानुवर्षे जगभरात उद्योगांना चालवत आहे. कोविड - 19 च्या साथीने या बदलाला वेग आला आहे. जे घडण्यासाठी वर्षानुवर्षे लागत होती, ते आता महिन्यांत घडत आहे,' असे ते म्हणाले.
मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स 365 संघटनांना प्रोजेक्ट ऑपरेशन्स, नवीन सौदे मिळवणे, प्रकल्पांचा मागोवा घेणे व व्यवस्थापन करणे, उत्तम कामगिरी टिकवून ठेवणे आणि नफा वाढविण्यात मदत करेल, असे सोढी म्हणाले.
हेही वाचा - ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या आयातीत गतवर्षाच्या तुलनेत 36 टक्क्यांनी वाढ