ETV Bharat / business

बिल गेट्स यांच्या महिला कर्मचारीबरोबरील विवाहबाह्य संबंधांचा मायक्रोसॉफ्टने केला तपास

author img

By

Published : May 17, 2021, 8:13 PM IST

अमेरिकेतील माध्यमाने सुत्राच्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती दिली आहे. त्याबाबत चौकशी करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने २०१९ ला कायदेशीर संस्था नेमली होती.

Bill Gates
बिल गेट्स

न्यूयॉर्क - मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचे महिला कर्मचाऱ्याबरोबर विवाहबाह्य संबंध होते, असे अमेरिकेच्या माध्यमाने म्हटले आहे. त्यामुळे बिल गेट्स हे संचालक मंडळात असू नये, असे इतर संचालकांचे मत झाले होते.

अमेरिकेतील माध्यमाने सुत्राच्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती दिली आहे. त्याबाबत चौकशी करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने २०१९ ला कायदेशीर संस्था नेमली होती. त्यावेळी तपास गेट्स यांचे मायक्रोसॉफ्टमधील महिला अभियंताबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले होते. मात्र, हा तपास येण्यापूर्वीच गेट्स यांनी संचालक मंडलाचा राजीनामा दिला होता. त्यासाठी त्यांनी वेगळे कारणही दिले होते.

हेही वाचा-होंडाकडून मोफत सेवेसह वॉरंटीमध्ये ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

मायक्रोसॉफ्टचे संचालकपद सोडताना दिले होते वेगळे कारण-

सूत्राच्या माहितीनुसार बिल गेट्स यांची महिला कर्मचाऱ्यासोबत २० वर्षे विवाहबाह्य संबंध होते. मात्र, कोणत्याही वादाविना हे संबंध संपुष्टात आले. प्रवक्त्याच्या माहितीनुसार बिल गेट्स यांनी संचालक मंडळाचा राजीनामा देण्यामागे या प्रकरणाचा संबंध नव्हता. गतवर्षी मायक्रोसॉफ्टचे संचालकपद सोडताना गेट्स यांनी परोपकारी कामावर लक्ष केंद्रित करण्यासाटी हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा-एनईएफटी सेवा २२ मे रोजी १४ तास राहणार बंद

समाजकार्य करण्यासाठी एकत्रित करणार काम-

दरम्यान, बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी २७ वर्षांच्या विवाहानंतर घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. मात्र, बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसाठी एकत्रित काम करणार असल्याचे जाहीर केले. बिल आणि मेलिंडा गेट्स ही जगातील सर्वात मोठी धर्मादाय विश्वस्त संस्था आहे. गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती १०० अब्ज डॉलरहून अधिक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.