मुंबई - कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने मर्सिडीज बेन्झ कंपनीने पुण्याच्या चाकण प्रकल्पामधील उत्पादन थांबविले आहे. कंपनीने ३१ मार्चपर्यंत कोणतेही उत्पादन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मर्सिडीज बेन्झ कंपनीकडून २१ मार्चपासून काम तात्पुरते थांबविण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या व्यवस्थापनाचेही काम ३१ मार्चपर्यंत स्थगित केले आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य लक्षात घेवून ही पूर्वसावधगिरी म्हणून काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता येणार आहे.मर्सिडिज बेन्झ इंडियाचे वरिष्ठ हे परिस्थितीचा सतत आढावा घेत आहेत.
हेही वाचा-कोरोनाशी लढा देण्याकरता 'हीरो' करणार १०० कोटींची तरतूद
आवश्यकता भासली तर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. ग्राहकांसह कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे कंपनीने म्हटले आहे.