नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार उत्पादक मारुती सुझुकी इंडियाने ४० हजार ६१८ वॅगनॉर परत मागविल्या आहेत. फ्यूएल होस व्यवस्थेमधील दोष दूर करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
मारुती सुझुकी कंपनीने उत्सूर्फतपणे आणि पूर्व-सावधगिरी म्हणून वॅगनॉर परत मागविल्या आहेत. या कार १५ नोव्हेंबर २०१८ ते १२ ऑगस्ट २०१९ दरम्यान उत्पादित करण्यात आल्या आहेत. परत मागविलेल्या कारमधील फ्यूएल होसची मारुती सुझुकी तपासणी करणार आहे.
वॅगनॉरचे मालक २४ ऑगस्ट २०१९ पासून डीलरशी संपर्क साधून वाहनाची तपासणी करू शकणार आहेत. तसेच सदोष वाहनाचा मोफत पार्ट बदलून घेवू शकणार आहेत. ही वाहने जगभरातून परत मागविली जाणार आहेत. इंजिनमधील दोष ही सुरक्षिततेच्या दृष्टीने त्रुटी असण्याची शक्यता आहे.