ETV Bharat / business

'वास्तवदर्शी डिजीटल अवतार करण्यासाठी प्रयत्न सुरू'

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेबर्ग पॉडकास्टमध्ये श्रोत्यांशी संवाद साधताना म्हणाले की, फेसबुकच्या ओकुलस व्हीआर हेडसेटडमध्ये वापरकर्त्याला प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव मिळू शकतो. आम्ही मुलभूतपणे सामाजिक कंपनी आहोत.

realistic digital avatars
डिजीटल अवतार
author img

By

Published : Mar 9, 2021, 3:44 PM IST

सॅन फ्रान्सिस्को- व्हर्च्युल रिअॅल्टी (व्हीआर) हेडसेटमध्ये अधिक वास्तवदर्शी डिजीटल अवतार आणण्याचे उद्देश असल्याचे कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले. यामध्ये डोळ्यांसह आणि चेहऱ्याचा मागोवा (ट्रॅकिंग) घेण्याचा समावेश असल्याचे झुकेरबर्ग यांनी सांगितले. त्यामुळे वापरकर्त्यांना साधनांमधून अधिक सामाजिक अनुभव मिळणे शक्य होणार असल्याचे मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेबर्ग पॉडकास्टमध्ये श्रोत्यांशी संवाद साधताना म्हणाले की, फेसबुकच्या ओकुलस व्हीआर हेडसेटडमध्ये वापरकर्त्याला प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव मिळू शकतो. आम्ही मुलभूतपणे सामाजिक कंपनी आहोत. आम्ही लोकांना एकमेकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यामध्ये खासगी संदेशांसह अधिक व्हिडिओ, फोटो हे सामाईक करण्याचा समावेश आहे. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी प्रत्यक्ष भेटत असल्याचा अनुभव देणे हा चांगला सामाजिक अनुभव ठरतो.

हे वाचा- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल ७० डॉलर; देशात इंधनाचे दर 'जैसे थे'

डिजीटल अवतारामध्ये दिसू शकणार भावना-

फोन, कॉम्प्युटर, टीव्ही आणि व्हिडिओ चॅटमध्ये भेटण्यासाठी तेवढे पुरेसे तंत्रज्ञान नाही. आपल्याकडे प्रत्यक्ष भासणारे तुमच्यासाठी अवतार असणार आहेत. यामध्ये तुम्हाला खरोखर डोळ्यांनी पाहण्याचा अनुभव मिळणू शकणार आहे. तसेच भावनाही अनुभव शकणार आहेत. हे तुम्हाला तुमच्या अवातारामध्ये अनुभवता येणार आहे. केवळ व्हीआर हेडसेटच नव्हे तर फेसबुकनेही अवतार हे फीचर गतवर्षी लाँच केले आहे. त्यामध्ये वापरकर्त्याला वैयक्तिक व्यक्तिमत्वाला साजेसे चेहरा, केशभुषा व देहयष्टी निवडता येते. त्याचा वापर हा कॉमेंट, मेसेंजर चॅट आणि व्हॉट्सअपमध्ये करता येतो.

हेही वाचा-नीता अंबानी यांनी खास महिलांकरिता लाँच केले 'हर सर्कल' डिजीटल माध्यम

दरम्यान, फेसबुकने गतवर्षी सप्टेंबरमध्ये ओक्युलस क्वेस्ट २ लाँच केले होते. या व्हर्चुअल रिअॅल्टी हेडसेटमध्ये पुढील पिढीसाठी लागणारे तंत्रज्ञान आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.