ETV Bharat / business

कोरोनाशी लढा : दिल्लीमधील सर्व मोठ्या बाजारपेठा बंद - अखिल भारतीय व्यापारी संघटना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला संबोधित असताना घरातून काम करण्याचे आवाहन केले होते. तसेच कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी काळजी घेण्यास सांगितले होते. त्याला प्रतिसाद म्हणून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत.

बाजारपेठा बंद
बाजारपेठा बंद
author img

By

Published : Mar 21, 2020, 4:30 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीमधील सर्व मोठ्या घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा आज बंद राहिल्या आहेत. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) तीन दिवसाचा बंद आजपासून जाहीर केला आहे.

सीएआयटीच्या माहितीनुसार दिल्लीमधील १४ लाख व्यवसायिक आस्थापना बंद राहिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला संबोधित असताना घरातून काम करण्याचे आवाहन केले होते. तसेच कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी काळजी घेण्यास सांगितले होते. त्याला प्रतिसाद म्हणून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत.

हेही वाचा-रेल्वेचे तिकिट रद्द झाले तरी चिंता नको...४५ दिवसापर्यंत मागू शकता रिफंड

दिल्लीमध्ये सुमारे दीड कोटी लहान-मोठे व्यवसायिक आहेत. तर ३० लाख लोक दिल्लीमध्ये विविध दुकान आणि व्यवसायिक आस्थापनांमध्ये नोकरी करत आहेत. व्यापारी, कर्मचारी आणि नागरिकांचे कोरोनापासून वाचण्यासाठी हा बंद खूप ठरणार असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे. मेडिकल दुकान, भाजीपाल्याचे दुकान आणि जीवनावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकाने सुरू असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे.

दिल्लीच्या सरकारनेही अनेक निर्बंध लागू केले आहेत.

हेही वाचा-कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करा, सरकारच्या उद्योगांना सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.