ETV Bharat / business

थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; हे राज्य अग्रसेर

एकीकडे महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक घटत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये हेच प्रमाण दुप्पटीने वाढले आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात ८० हजार १३ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली होती.

foreign direct investment
थेट विदेशी गुंतवणूक
author img

By

Published : Mar 5, 2020, 3:10 PM IST

मुंबई - थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राने अव्वल क्रमांक गमाविला आहे. गेल्या वर्षभरातील थेट विदेशी गुंतवणुकीच्या आकडेवारीनुसार कर्नाटकने विदेशी गुंतवणुकीत अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याचे आर्थिक पाहणी अहवालामधून समोर आले आहे.

अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात आज आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांना महाराष्ट्राहून कर्नाटकला अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. एकीकडे महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक घटत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये हेच प्रमाण दुप्पटीने वाढले आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात ८० हजार १३ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली होती. यावर्षी हे प्रमाण २५ हजार ३१६ कोटीपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-VIDEO: अर्थसंकल्प सोप्या भाषेत! पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राजकीय नेत्यांची टोलेबाजी

मागील वर्षी राज्यात ८० हजार १३ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक होती. तर यावर्षी ही गुंतवणूक अवघी २५ हजार ३१६ कोटी रुपये होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, फडणवीस सरकारने थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्रच देशात पहिला क्रमांकावर असल्याचा दावा केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.