मुंबई - चीनमधील अनेक उद्योग विदेशात जाण्यासाठी उत्सुक असताना त्यांना आकर्षित करण्याकरता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याकरता विदेशात नोव्हेंबरमध्ये 'रोड शो' घेतले जाणार आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील सेमिनारमध्ये उद्योग धोरणाविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, राज्याने २०२५ पर्यंत १ लाख कोटींची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी वाहन उद्योग, स्टील, वस्त्रोद्योग, कृषीप्रक्रिया आणि फार्मा कंपन्यांना गुंतवणूकीसाठी केंद्रित करण्यात येणार आहे.
हेही वाचा-धक्कादायक! आरबीआयकडून ६८ हजार कोटी रुपयांचे कर्ज निर्लेखित
चीनमधून राज्यात येणाऱ्या उद्योगांना विशेष पॅकेज देण्यावर विचार चालू असल्याची त्यांनी माहिती दिली. कोरोनाचे संकट असतानाही चिनी वाहन कंपनी ग्रेट वॉल मोटर्सने इलेक्ट्रिक वाहन सुविधा आणि बॅटरीचे उत्पादन पुण्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-तामिळनाडूचे एक पाऊल पुढे... गुंतवणूक आकर्षित करण्याकरता 'हा' घेतला निर्णय
रेड झोन आणि कंटेन्टमेंट झोन नसलेल्या भागात २० एप्रिलपासून काही अटींवर उद्योग सुरू करण्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार ६ हजार ५०० उद्योग सुरू झाल्याचे कांबळे यांनी सांगितले. तर ४ हजार उद्योगांनी काम सुरू करण्याची परवानगी करणारे अर्ज केल्याची त्यांनी माहिती दिली. महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले राज्य मानले जाते.