ETV Bharat / business

अबब!!! महागडा घटस्फोट, पतीकडून मिळणार फक्त.. २ लाख ६६ हजार कोटी - MacKenzie Bezos

मॅकेन्झी या ४९ वर्षे वयाच्या लेखिका आहेत. त्यांनी यापूर्वीच मिळणाऱ्या रक्कमेतील अर्धी रक्कम समाजसेवेसाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे.

मॅकेन्झी
author img

By

Published : Jul 2, 2019, 6:12 PM IST

Updated : Jul 2, 2019, 6:34 PM IST

वॉशिंग्टन - मॅकेन्झी बेझोस...जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या अॅमेझॉनच्या संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोसची पत्नी...त्यांचा घटस्फोट होताना एकाच वेळी तडतोडीतून दिली जाणारी रक्कम ही भल्याभल्यांचे डोळे दिपावणारी आहे. तब्बल ३८ अब्ज डॉलर म्हणजे २ लाख ६६ हजार कोटी जेफ पत्नीला घटस्फोटानंतर देणार आहे. ही रक्कमच एवढी मोठी आहे की, या घटस्फोटानंतर मिळालेल्या रकमेतून ती जगातील चौथ्या क्रमांकाची महिला होणार आहे.

मॅकेन्झी या ४९ वर्षे वयाच्या लेखिका आहेत. त्यांनी यापूर्वीच मिळणाऱ्या रक्कमेतील अर्धी रक्कम समाजसेवेसाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे. अॅमेझॉनचा संस्थापक जेफ पत्नी मॅककेन्झी बेझोसला घटस्फोट देणार असल्याने जगभरात चर्चेचा विषय झाला आहे. या घटस्फोटानंतर मॅककेन्झी यांना पतीकडून मोठी रक्कम मिळणार आहे. मिळणारी निम्मी रक्कम म्हणजे १ लाख ३३ हजार कोटींचे दान करणार असल्याचा निर्णय मॅककेन्झी यांनी जाहीर केला आहे.

वॉरेन बफेट यांनी २०१० मध्ये सेवाभावी संस्थेची स्थापना केली. या संस्थेला चीन, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिराती आणि इंग्लंडच्या देशातील अब्जाधीशांसह बिल गेट्स यांनी दान दिले आहे. या संस्थेला दान करण्याच्या प्रतिज्ञेत सहभागी होणार असल्याचे मॅककेन्झी यांनी जाहीर केले.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफने घटस्फोट दिल्यानंतर मॅककेन्झी यांची संपत्ती ही ३८०० कोटी डॉलरहून अधिक होणार आहे. फोर्ब्सने अब्जाधीशांच्या यादीत मॅकेन्झी यांचा अद्याप समावेश केला नाही. घटस्फोटानंतर त्या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला ठरणार आहेत. आयुष्यात जी काही मालमत्ता मिळाली, त्याने आयुष्याचे पोषण केल्याचे मॅककेन्झी यांनी म्हटले आहे. माझ्याकडे वाटण्यासाठी भरपूर संपत्ती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मॅकेन्झी यांना मिळणारी रक्कम तेलंगणा राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाहून मोठी आहे. तेलंगणा राज्याने २ लाख १० कोटींचा अंतरिम अर्थसंकल्प फेब्रुवारीत मंजूर केला.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.