ETV Bharat / business

एलआयसी विमा हप्ता भरण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ - एलआयसी

कोरोनाचा प्रसार होत असताना कार्यालयात येवू नये, असे एलआयसीने म्हटले आहे. विमा ग्राहकांनी ऑनलाईन सेवा घेण्याचे एलआयसीने आवाहन केले आहे.

एलआयसी
एलआयसी
author img

By

Published : Mar 23, 2020, 2:25 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाने सर्व जनजीवन आणि उद्योग ठप्प झाले आहेत. अशा स्थितीत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) १५ एप्रिलपर्यंत विमा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

कोरोनाचा प्रसार होत असताना कार्यालयात येवू नये, असे एलआयसीने म्हटले आहे. विमा ग्राहकांनी ऑनलाईन सेवा घेण्याचे एलआयसीने आवाहन केले आहे. देशातील कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या असाधारण स्थितीत एलआयसीने विमा हप्ता भरण्यासाठी १५ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने विविध राज्ये आणि दिल्ली बंद आहे. तर राज्य व केंद्र सरकारने लोकांना प्रवास टाळून घरात राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या लढ्याकरता वेदांत कंपनीकडून १०० कोटींचा निधी

दरम्यान, कोरोनाने जगभरात १३,०४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३.७ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशामध्ये सुमारे ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा-शेअर बाजार ३,१८२ अंशांनी आपटला; गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी पाण्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.