ETV Bharat / business

'लक्ष्मी विलास'चे-डीबीएस बँकेत २७ नोव्हेंबरला होणार विलिनीकरण -आरबीआय

लक्ष्मी विलास बँकेचे (एलव्हीबी) डीबीएसमध्ये विलिनीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर काहीच तासाच आरबीआयने विलिनीकरण २७ नोव्हेंबरपासून विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे.

लक्ष्मी विलास बँक
लक्ष्मी विलास बँक
author img

By

Published : Nov 25, 2020, 8:04 PM IST

मुंबई - संकटात सापडलेल्या लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस बँक इंडियात विलिनीकरण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. हे विलिनीकरण २७ नोव्हेंबरपासून लागू होणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. बँकेचे विलिनीकरण झाल्यानंतर एक महिन्याचे लागू झालेले निर्बंध हटविण्यात येणार असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.

लक्ष्मी विलास बँकेचे (एलव्हीबी) डीबीएसमध्ये विलिनीकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर काहीच तासाच आरबीआयने विलिनीकरण २७ नोव्हेंबरपासून विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. एलव्हीबीच्या सर्व शाखा डीबीएस बँकेच्या म्हणून कार्यरत राहणार आहेत. लक्ष्मी विलास बँकेच्या ठेवीदारांना डीबीएस बँक इंडियामधून त्याचे खाते शुक्रवारपासून वापरता येणार आहेत.

हेही वाचा-लक्ष्मी विलास बँकेच्या शेअरला मोठा फटका; पाच दिवसांत ४८ टक्क्यांनी घसरण

शुक्रवारपासून एलबीव्हीवरील निर्बंध हटविण्यात येणार असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयने बँकेवर १७ नोव्हेंबरला निर्बंध लागू केले होते. लक्ष्मी विलास बँकेच्या ग्राहकांना नियमित सेवा देण्याकरता डीबीएस बँक इंडियाकडून आवश्यक ती पूर्तता करण्यात येत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

एलव्हीबी बँकेच्या शेअरची पाच दिवसात ४८ टक्क्यांनी घसरण झाली होती. बँकेच्या विलिनीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर शेअर आज मुंबई शेअर बाजारात ५ टक्क्यांनी वधारले आहेत.

हेही वाचा-लक्ष्मी विलास बँकेच्या विलिनीकरणाची योजना; आरबीआय पुढील आठवड्यात करणार जाहीर

एलव्हीबी बँकेवर १७ नोव्हेंबरला लादण्यात आले होते निर्बंध-

केंद्र सरकारकडून लक्ष्मी विलास बँकेवर अनेक प्रकारची बंधने घालण्यात आली आहेत. पुढील एका महिन्यासाठी ही बंधने असणार आहेत. आता या बँकेतून ग्राहकांना १६ डिसेंबरपर्यंत केवळ २५ हजार रुपयेच काढता येणार आहेत. गेल्या १ वर्षापासून ही बँक तो़ट्यात होती. बँक व्यावाहारांमध्ये देखील अफरातफर झाल्याचा संशय आहे. म्हणून या बँकेवर बंधने घातण्यात आली आहेत. कॅनरा बँकेचे माजी कार्यकारी अध्यक्ष टी. एन. मनोहरन यांना या बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.