ETV Bharat / business

कोरोना परिणाम: कुवेत आर्थिक संकटात; सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नाहीत पैसे - Kuwait budget deficit in Pandemic

महामारी आणि खनिज तेलाच्या किमती घसरल्याने कुवेतच्या अर्थसंकल्पातील वित्तीय तूट वाढून 45.78 अब्ज डॉलर झाली आहे. यापूर्वी वित्तीय तूट 25.18 अब्ज डॉलर राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

कुवेतचे आर्थिक चलन
कुवेतचे आर्थिक चलन
author img

By

Published : Aug 24, 2020, 2:08 PM IST

कुवेत शहर – खनिज तेलाने समृद्ध असूनही कुवेत देशापुढे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. कुवेतला सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देणे कठीण झाले आहे. या देशाच्या खजिन्यात केवळ 6.6 अब्ज डॉलर असल्याचा इशारा अर्थमंत्री बराक-अल-शीतान यांनी दिला आहे.

देशातील अपुऱ्या चलनाच्या समस्येवर मात करण्यासाठी नोव्हेंबरनंतर आमच्याकडे पैसे नाहीत, असे कुवतेचे अर्थमंत्री बराक-अल-शीतान यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की खनिज तेलाच्या किमती वाढल्या नाही तर सध्या असलेल्या पैशांचा वापर सुरू राहणार आहे. हे पैसे जनरल रिझर्व्ह फंडमधून काढण्यात येत आहे. हे पैस खर्च होत असल्याची अगतिकता अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

महामारी आणि खनिज तेलाच्या किमती घसरल्याने कुवेतच्या अर्थसंकल्पातील वित्तीय तूट वाढून 45.78 अब्ज डॉलर झाली आहे. यापूर्वी वित्तीय तूट 25.18 अब्ज डॉलर राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

कुवेतचे सर्व अर्थकारण हे संपूर्णपणे खनिज तेलाच्या राखीव साठ्यावर चालते. मात्र, खनिज तेलाच्या किमती घसरल्याने कुवेतला आर्थिक समस्येवर मात करणे कठीण जात आहे. आंतरराष्ट्रीय रोखे बाजारातील पैसे परत करण्यावरून कुवेतचे अर्थमंत्री हे टीकेचे धनी ठरले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.