ETV Bharat / business

केंद्र सरकारचे ट्विटरबरोबर उडाले खटके; 'कू'ला मिळाला फायदा - कू समाज माध्यम कंपनी न्यूज

ट्विटरकडून नियमांचे पालन होत नसल्याची टीका केंद्रीय मंत्र्यांकडून वारंवार होत आहे. अशातच केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'कू'वर अकाउंट सुरू केले आहे.

कू
कू
author img

By

Published : Feb 11, 2021, 7:16 PM IST

नवी दिल्ली - दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ होतो, याचा अनुभव 'कू' ही सोशल मीडिया कंपनी घेत आहे. समाज माध्यमातील काही अकाउंटवर कारवाई करण्यावरून ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद आहेत. या मतभेदामुळे चर्चेत आलेल्या 'कू'वर वापरकर्त्यांची संख्या ३० लाखांहून अधिक झाली आहे.

ट्विटरकडून नियमांचे पालन होत नसल्याची टीका केंद्रीय मंत्र्यांकडून वारंवार होत आहे. अशातच केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'कू'वर अकाउंट सुरू केले आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांनी 'कू' या समाज माध्यमांचा वापर करण्याचे अनुसरणकर्त्यांना (फॉलोअर्स) आवाहन केले आहे.

हेही वाचा-इंधनात दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोलचा दर शंभरीजवळ!

काय आहे कू?

कू हे ट्विटरप्रमाणे मायक्रोब्लॉगिंग माध्यम आहे. कूवर पिवळ्या रंगाच्या पक्ष्यांचा लोगो आहे. तर ट्विटरवर निळ्या रंगाचा पक्षी आहे. गेल्या आठवडाभरात कू अॅपच्या डाउनलोडची संख्या दहापटीने वाढ झाली आहे. कू हे हिंदी, इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा-देशात पहिल्यांदाच सीएनजीवर चालणार ट्रॅक्टर; नितीन गडकरी करणार लाँचिंग

ट्विरटरचे १७.५ दशलक्ष वापरकर्ते आहेत. ट्विटरचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध केंद्रीय मंत्री व मंत्रालयांकडून करण्यात येतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.