मुंबई - डिजिटल अर्थव्यवस्था असतानाही अनेकदा रोख रकमेचा आपल्याला वापर करावा लागतो. मात्र एटीएमचा ठराविक मर्यादेहून जास्त वापर केल्यास बँकेकडून सेवा शुल्क आकारण्यात येते. हे टाळण्यासाठी एटीएम अथवा डेबिट कार्डचा वापर 'स्मार्ट' पद्धतीने करणे आवश्यक आहे.
आरबीआयच्या २०१४ च्या सूचनेनुसार बँकांना काही व्यवहार (ट्रान्झक्शन) मोफत करण्याची सेवा द्यावी लागते. ज्या बँकेचे कार्ड आहे, त्याच बँकेच्या एटीएममध्ये ५ वेळा आर्थिक व्यवहार करण्यासाठी शुल्क आकारण्यात येत नाही. यामध्ये आर्थिक (पैसे काढणे) आणि बिगर आर्थिक व्यवहाराचा (पिन क्रमांक बदलणे) समावेश आहे. तर इतर बँकेच्या एटीममधून तीनवेळा मोफत सेवेचा लाभ घेता येतो.
हेही वाचा-'अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत; इलेक्ट्रॉनिक्ससह मोबाईल कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी'
जर एटीएमचा वापर करण्याची ग्राहकाने मर्यादा ओलांडली तर त्यासाठी बँकेकडून सेवा शुल्क लागू करण्यात येते. पैसे काढण्यावर २० रुपये तर पिन क्रमांक बदलणे व मिनी स्टेमेंट काढणे अशा सेवा घेण्यासाठी ८.५ रुपये आकारण्यात येतात. हे जास्तीत जास्त शुल्क बँकेकडून आकारण्यात येते. भारतीय रिझर्व्ह बँकेने जून २०१९ मध्ये सर्व बँकांना एटीएमच्या वापराचे शुल्क आणि फीचे परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही बँकांनी एटीएमचे शुल्क बदलले आहे.
हेही वाचा-डीएचएलएफकडून नवीन गुरुग्रामधील जमिनीची विक्री; प्रति एकरचा दर ऐकून व्हाल थक्क!
एटीएमवरील सेवा शुल्क कसे टाळावे -
एटीएम कार्डच्या मर्यादाप्रमाणेच वापर करणे हे बँकेचे सेवा शुल्क टाळण्याचा सोपा आहे. त्यासाठी खालील पर्यायाचा तुम्हा वापर करू शकता. बँकेच्याच एटीएमचा वापर करणे- आयसीआयसीआयसारख्या काही बँका त्यांच्या एटीएममधून कार्डचा वापर करण्याच्या वापरावर ग्राहकांना बंधन घालत नाही. त्यामुळे ज्या बँकेचे कार्ड आहे, त्याच बँकेच्या एटीएमचा वापर करण्याला प्राधान्य देणे फायद्याचे ठरते. खूपच तातडीचे गरज असेल तेव्हा इतर बँकेच्या एटीएमचा वापर करावा.
हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ४६० रुपयांची वाढ; रुपया कमकुवत झाल्याचा परिणाम
ऑनलाईन बिल देणे - अनेक बिले ही ऑनलाईन भरता येतात. त्यासाठी डेबिट कार्ड स्विकारली जाते. उदाहरणार्थ - वीज बिल
मोबाईल बँकिंग -खात्यावर किती रक्कम आहे अथवा मिनी स्टेटमेंट घेण्याची सुविधा मोबाईल बँकिंगमध्ये आहे. त्यामुळे अशा कारणासाठी एटीएमचा वापर करणे टाळावे.
रोख रक्कमेचा वापर करणे - अनेक दुकानामध्ये डेबिट कार्ड अथवा फोन अॅपद्वारे रक्कम स्विकारली जाते. त्यामुळे अशा ठिकाणी रोख रक्कम देणे टाळावे.