मुंबई - कोरोनाच्या संकटात नोकरी निवडताना नवा ट्रेण्ड आला आहे. फेब्रुवारी ते मे दरम्यान घरून काम करता येईल, अशा नोकऱ्यांच्या सर्च करण्याचे प्रमाण ३७७ टक्क्यांनी वाढले आहे.
नोकरी शोधताना अनेकजण रिमोट आणि Iघरून काम करणे (वर्क फ्रॉम होम) अशा पर्यायांचा शोध घेत असल्याचे इंडिड या नोकरीविषयक वेबसाईटने म्हटले आहे. रिमोट वर्क आणि वर्क फ्रॉम होमच्या नोकऱ्या पोस्ट करण्याचे प्रमाणही १६८ टक्क्यांनी वाढले आहे. कोरोनाच्या संकटामुळे कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. अनेकजण घरून काम करण्याला प्राधान्य देणार आहेत. त्यासाठी कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकसित करणे आणि कौशल्य अद्ययावत करण्याकडे लक्ष द्यावे लागणार असल्याचे इंडिडने म्हटले आहे.
हेही वाचा-वीज कंपनीतील कर्मचारी 1 जूनला पाळणार 'निषेध दिन'; 'हे' आहे कारण
दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी देशात २५ मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत.
हेही वाचा-पार्ले कंपनीसमोर अपुऱ्या मनुष्यबळाचे आव्हान; सरकारकडे 'ही' केली मागणी