मुंबई - जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांनी राजीनामा दिला आहे. जेटवर ८ हजार कोटींचे कर्ज असल्याने कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे.
आपतकालीन मंडळाच्या बैठकीत नरेश गोयल यांनी राजीना दिला आहे. नरेश गोयल हे जेट एअरवेजचे प्रमोटर आणि संस्थापक आहेत. जेट एअरवेजने तात्पुरता निधी मिळविण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जेट एअरवेजला कर्ज मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. १ जानेवारीपासून वैमानिक, कर्मचारी आणि इंजिनिअर यांचे वेतन थकित आहे. त्यामुळे हे कर्मचारी दुसऱ्या कंपनीत नोकऱ्या शोधत आहेत. डिसेंबर महिन्याचे केवळ १२.५ टक्के वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.