ETV Bharat / business

जम्मू आणि काश्मीरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गुंतवणूक वाढविण्याकरिता पुण्यात प्रयत्न - Mahmood Ahmad Shah

जम्मू आणि काश्मीरचे उद्योग आणि वाणिज्य संचालक महमूद अहमद शाह म्हणाले,  श्रीनगरमध्ये गुंतवणुकदारांची परिषद आहे. याला गती मिळण्यासाठी आम्ही विविध क्षेत्रांशी चर्चा करत आहोत.  याची आम्ही पुण्यापासून सुरुवात केली आहे.

संग्रहित - जम्मू आणि काश्मिर
author img

By

Published : Aug 30, 2019, 1:10 PM IST

पुणे - विशेष दर्जा काढल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये विविध उद्योगांनी गुंतवणूक करावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. याबाबत विविध उद्योग प्रतिनिधी व शिक्षणसंस्थांशी चर्चा करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरचे उद्योग आणि वाणिज्य संचालक महमूद अहमद शाह हे पुण्यात आले होते. त्यांनी तेथे व्यवसाय करण्यासाठी भरपूर संधी असल्याचे विविध व्यवसायाच्या प्रतिनिधींना सांगितले.

जम्मू आणि काश्मीरचे उद्योग आणि वाणिज्य संचालक महमूद अहमद शाह म्हणाले, श्रीनगरमध्ये गुंतवणुकदारांची परिषद आहे. याला गती मिळण्यासाठी विविध क्षेत्रांशी चर्चा करत आहोत. याची आम्ही पुण्यापासून सुरुवात केली आहे. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. शहरामधील सरहद ही एनजीओ काश्मिरी विद्यार्थ्यांसाठी काम करते. ही एनजीओ सरकारला विविध क्षेत्र, शिक्षणसंस्था आणि उद्योगपतीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुकामेवा आणि सफरचंद प्रक्रिया उद्योगासाठी खूप संधी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा- श्रीनगरमध्ये १२ ऑक्टोबरला जागतिक गुंतवणुकदारांच्या परिषदेचे आयोजन

पुढे ते म्हणाले, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध उद्योगपती आणि शिक्षणसंस्थांनी काश्मीरच्या खोऱ्यात त्यांच्या सुविधा द्याव्या यासाठी चर्चा करत आहोत. ही प्राथमिकस्तरावरील बैठक होती. येत्या काही दिवसात आणखी स्पष्टपणे नियोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा - जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार देणार ५० हजार नोकऱ्या

काश्मीरमध्ये शिक्षणसंस्था सुरू करण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रतिनिधींची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जे काश्मीरमध्ये येवून रुग्णालय, वैद्यकीय सुविधा आणि शिक्षणसंस्था सुरू करणार आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो. त्यातून रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. तसेच स्थानिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. पुण्यामधून काय मदत मिळू शकते, हे आम्ही पाहात आहोत. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील स्थिती वेगाने सुधारत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -जम्मू-काश्मीरमध्ये एअरलाईन तिकीट बुकींग काऊंटर सेवा सुरु

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.