श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतर धुमसणाऱ्या नंदनवनाला सरकारने मोठा दिलासा दिला आहे. तिथे सरकार ५० हजार सरकारी नोकऱ्या देणार आहे. याबाबतची घोषणा जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.
सरकारी नोकऱ्या जम्मू आणि काश्मीर प्रशासनामध्ये असणार आहेत. भरती प्रक्रियेमध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले. येत्या दोन-तीन महिन्यात पदे भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.