ETV Bharat / business

चांद्रयान नव्हे इस्रोची 'ही' कामगिरी जाणून थक्क व्हाल! - space department

पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री  जितेंद्र सिंह यांनी इस्रोच्या आर्थिक कामगिरीची लोकसभेत माहिती दिली.  अँट्रिक्स कॉर्पोरेशनच्या जागी न्यूस्पेस इंडिया लिमिटेडची (एनएसआयएल) स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी  सांगितले.

अँट्रिक्स कॉर्पोरेशन
author img

By

Published : Jul 28, 2019, 6:19 PM IST

नवी दिल्ली - इस्रोच्या चांद्रयानाची कामगिरीचे जगभरात कौतुक होत आहे. मात्र इस्रोने केवळ संशोधनच नव्हे तर व्यावसायिक पातळीवरही यश मिळवून देशाचा फायदा करून दिला आहे. अँट्रिक्स कॉर्पोरेशन ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) व्यावसायिक संस्था आहे. या कंपनीने २३९ उपग्रहांचे प्रक्षेपण करून ६ हजार २८९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोच्या आर्थिक कामगिरीची लोकसभेत माहिती दिली. अँट्रिक्स कॉर्पोरेशनच्या जागी न्यूस्पेस इंडिया लिमिटेडची (एनएसआयएल) स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. न्यूस्पेस इंडिया लिमिटेड ही अंतराळ विभागाच्या अखत्यारीत कंपनी येते. या कंपनीकडून इस्रोकरता व्यावसायिक संशोधन आणि विकास करण्यात येत असल्याचे जिंतेद्र सिंह यांनी सांगितले.

जागतिक पातळीवर अंतराळ बाजारपेठेचा विकास होत आहे. या बाजारपेठेची व्यवसायिक मागणी लक्षात घेवून एनएसआयएलकडून यंत्रणा तयार करण्यात आली आहे. भारतीय उद्योगाचाही अंतराळ क्षेत्रात विकास होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

भारत हा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अंतराळ क्षेत्रात शक्ती असलेला महत्त्वाचा देश होत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले होते. कारण कमी खर्चात उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची इस्रोकडे क्षमता आहे.

Intro:Body:

business

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.