नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग देशात वेगाने पसरत असताना आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांना आरोग्य विम्याचे दावे दोन तासांत निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.
आयआरडीएआय विमा कंपन्यांना दावे वेगाने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी वेळेची मर्यादा पाळावी, असे आयआरडीएआयने आदेशात म्हटले आहे. आरोग्य विम्यासाठी विनंती केल्यानंतर रोकडविरहित उपचारासाठी (कॅशलेस ट्रीटमेंट) रुग्णालयाशी दोन तासांत विमा कंपन्यांनी संपर्क करावा, असेही विमा नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनाशी लढा; केंद्र सरकारकडून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारे पोर्टल लाँच
तृतीय पक्ष प्रशासकांना (टीपीए)योग्य मार्गदर्शक सूचना जारी करा, अशी आयआरडीएआयने सर्व जीवन विमा आणि आरोग्य विमा कंपन्यांनी (ईसीजीसी आणि एआयसी वगळता) सूचना केली आहे.
हेही वाचा-स्पाईसजेट 'या' कर्मचाऱ्यांना देणार विनावेतन सुट्टी