ETV Bharat / business

रेल्वेचे ई-तिकिट आजपासून महाग, एवढे द्यावे लागणार सेवाशुल्क - service charges

आयआरटीसीकडून बिगर वातानुकूलित आसनाच्या तिकिटावर १५ रुपये सेवा शुल्क लागणार आहे. तर वातानुकूलित आसनासाठी ३० रुपये द्यावे लागणार आहेत. यामध्ये पहिल्या वर्गाच्या तिकिटाचा समावेश असल्याचे आयआरटीसीने म्हटले आहे.

संग्रहित - रेल्वे
author img

By

Published : Sep 1, 2019, 12:51 PM IST

नवी दिल्ली - तुम्ही जर ऑनलाईन रेल्वे तिकीट काढणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण रेल्वे मंत्रालयाच्या आयआरसीटीसीने ई-तिकिटावर आजपासून सेवा शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयआरटीसीकडून बिगर वातानुकूलित आसनाच्या तिकिटावर १५ रुपये सेवा शुल्क लागणार आहे. तर वातानुकूलित आसनासाठी ३० रुपये द्यावे लागणार आहेत. यामध्ये पहिल्या वर्गाच्या तिकीटाचा समावेश असल्याचे आयआरटीसीने म्हटले आहे. तर ई-तिकिटावर स्वतंत्रपणे जीएसटी लागू होणार आहे.

हेही वाचा-रेल्वे बोगी कारखान्याचा प्रश्न थेट रेल्वे मंत्र्यांच्या दारी; अमित देशमुख दिल्ली दरबारी

रेल्वे मंडळाने इंडियन रेल्वे केटरिंग आणि टूरिझम कॉर्पोरेशनला (आयआरसीटीसी) पूर्वीप्रमाणे सेवाशुल्क लागू करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा- या' रेल्वे मार्गावर प्रवाशांना तिकिटावर मिळणार २५ टक्के सवलत

केंद्र सरकारने डिजीटल देयकांना चालना देण्यासाठी तीन वर्षापूर्वी ई-तिकिटावरील सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा बिगर वातानुकूलित तिकिटासाठी २० रुपये तर वातानुकुलित तिकिटासाठी ४० रुपये सेवा शुल्क प्रवाशांना द्यावे लागत होते. केंद्रीय वित्तीय मंत्रालयाने ई-तिकिटावरील सेवाशुल्क माफ करण्याचा निर्णय तात्पुरत्या काळासाठी घेतला होता. सेवा शुल्क माफ केल्यानंतर आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ई-तिकिटांच्या महसुलात २६ टक्के घट झाली होती.

हेही वाचा- ...तर रेल्वे स्टेशन, विमानतळांसह मॉलमध्ये मिळणार 'कुल्हड'मधून चहा

Intro:Body:

Business News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.