नवी दिल्ली - भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने (आयआरडीएआय) आरोग्य विमा योजनेबाबत महत्त्वाचे निर्देश काढले आहेत. कोरोनाविरोधातील लसीकरणाने दुष्परिणाम झाले तर अशा नागरिकांवर आरोग्य विमा योजनेप्रमाणे उपचार होऊ शकणार आहेत. याबाबतचे निर्देश आयआरडीएआयने विमा कंपन्यांना दिले आहेत.
कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींना कोरोनाविरोधात लढ्यात वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. या लस घेतल्यानंतर काहीजणांना दुष्परिणाम झाल्यास त्यावर आरोग्य विमा योजनेतून उपचार होणे शक्य आहेत का ? असा विमाधारकांमध्ये संभ्रम आहे. त्यावर आयआरडीएआय स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा-साईभक्तांच्या दानाच्या पैशांवर साई संस्थानच्या अधिकाऱ्यांनी केला पर्यटन दौरा
कोरोनाविरोधात लस घेतल्यानंतर रुग्णालयात उपचार घेण्याची गरज भासल्यास आरोग्य विमा योजनेनुसार उपचार करावेत, असे आयआरडीएआयने म्हटले आहे. तसेच विमा कंपन्यांनी विमा हप्त्यात वाढ करू नये, असेही आयआरडीएआयने विमा कंपन्यांना आदेश दिले आहेत.
हेही वाचा-धारावीत कोरोना वाढतोय! ३० नवीन रुग्ण, १४० सक्रिय रुग्ण
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण-
कोरोना रुग्णांची वाढती संख्या राज्याची चिंता वाढवणारी ठरत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आता मृत्युचे प्रमाणही वाढत असून रुग्ण दुपटीचा कालावधी घसरत चालला आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात आज 3,796 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 2977 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.