ETV Bharat / business

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरातील नागरिकांनी खरेदी केले 20 हजार कोटींचे सोने - आयबीजेए - दिवाळी सोने खरेदी न्यूज

आयबीजेएचे राष्ट्रीय सचिव मेहता म्हणाले की, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या विक्रीत वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या आठ महिन्यांपासून दागिने खरेदीतील घट. ते म्हणाले की, लॉकडाऊनदरम्यान लोक सोन्याचे दागिने विकत घेऊ शकले नाहीत. कारण बाजार बंद होता आणि बाजार उघडला होता, तेव्हा लग्नसराईचा हंगाम संपला होता. पण लग्नांचे मुहूर्त जसे पुढे सुरू होणार आहेत आणि लोक धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या खरेदीसाठीही थांबले होते. या कारणाने सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

सोने खरेदी न्यूज
सोने खरेदी न्यूज
author img

By

Published : Nov 14, 2020, 6:30 PM IST

मुंबई - धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर यंदा सोन्याच्या विक्रीत तब्बल 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आकडेवारीबद्दल बोलायचे तर, लोकांनी धनत्रयोदशीनिमित्त यंदा सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे सोने खरेदी केले. हा आकडा इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचा (आयबीजेए) आहे.

आयबीजेएच्या आकडेवारीनुसार, यावर्षी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याची सुमारे 40 टन एवढी विक्री झाली असून त्याचे मूल्य सुमारे 20 हजार कोटी रुपये आहे.

आयबीजेएचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी आयएएनएसला सांगितले की, गेल्या वर्षी सोन्याची विक्री सुमारे 12 हजार कोटी रुपये होती. तर या वर्षी ती 20 हजार कोटींवर गेली आहे.

मेहता म्हणाले, 'मागील वर्षी सुमारे 30 टन सोने विकले गेले. तर, यावर्षी सुमारे 40 टन सोन्याची विक्री झाली. मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या विक्रीच्या प्रमाणात 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु मूल्य तब्बल 70 टक्क्यांनी वाढले आहे.

हेही वाचा - लक्ष्मी पूजनानिमित्त आज शेअर बाजारात विशेष ट्रेडिंग, जाणून घ्या माहिती

मेहता म्हणाले की, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या विक्रीत वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या आठ महिन्यांपासून दागिने खरेदीतील घट. ते म्हणाले की, लॉकडाऊनदरम्यान लोक सोन्याचे दागिने विकत घेऊ शकले नाहीत. कारण बाजार बंद होता आणि बाजार उघडला होता, तेव्हा लग्नसराईचा हंगाम संपला होता. पण लग्नांचे मुहूर्त जसे पुढे सुरू होणार आहेत आणि लोक धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या खरेदीसाठीही थांबले होते. या कारणाने सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

ते म्हणाले की, दरम्यानच्या काळात सोन्याची किंमत 56 हजार रुपयांच्या उच्चांकी पातळी गाठल्यानंतर खाली आला आहे आणि कोरोनामुळे पुढे आणखी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे लोकांचा सोन्याच्या खरेदीचा कल वाढला आहे. मेहता म्हणाले की, यावेळी ज्वेलर्सनीही खूप आकर्षक ऑफर दिल्या. ज्यामुळे लोकांची सोने-चांदी खरेदी करण्याकडे रस वाढला आहे.

ते म्हणाले की, यावर्षी देशात धनत्रयोदशी दोन दिवशी साजरा करण्यात आली. काही ठिकाणी गुरुवारी लोकांनी उत्सव साजरा केला तर काही ठिकाणी शुक्रवारी. यामुळे लोकांना खरेदीसाठी अधिक वेळ मिळाला.

आयबीजेएच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी देशभरातील स्पॉट मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची सरासरी किंमत प्रति 10 ग्रॅम (जीएसटीशिवाय) 50 हजार 849 रुपये इतकी होती. तर आदल्या दिवशी प्रति 10 ग्रॅम 50 हजार 702 रुपये होते. तर, 22 कॅरेट शुद्ध सोन्याची सरासरी किंमत प्रति 10 ग्रॅम 50 हजार 645 रुपये होती, जी गुरुवारी प्रति 10 ग्रॅम 50 हजार 499 रुपये होती.

तर चांदीचा सरासरी दर 62 हजार 700 रुपये प्रतिकिलो होता. मागील सत्रातील दर 62 हजार 797 रुपये प्रतिकिलो होता. लोकांनी चांदीच्या दागिन्यांच्या तुलनेत चांदीच्या भांड्यांची खरेदी अधिक केली.

हेही वाचा - जाणून घ्या, धनत्रयोदशीला सोने-चांदीचे 'इतके' राहिले दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.