नवी दिल्ली - व्हिडिओ ऑन डिमांडच्या स्ट्रिमिंगच्या सेवेने आता लोकप्रियतेत टीव्हीलाही मागे टाकले आहे. कारण व्हिडिओ ऑन डिमांडच्या सेवेसाठी पैसे खर्च करण्यात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. प्रेक्षकांच्या सवयी बदलत असल्याने केबल टीव्ही आणि सेट टॉप बॉक्सचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
जर्मनीच्या स्टॅटिस्टा या संशोधन करणाऱ्या संस्थेने डिजीटल अर्थव्यवस्थेवर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये म्हटले आहे, की व्हिडिओ ऑन डिमांड सेवेसाठी पैसे खर्च करण्याची तयारी चीन, ब्राझीलनंतर भारतामधील नागरिक दाखवितात. हे प्रमाण ५२ टक्के आहे.
ऑनलाईन कटेन्टमध्ये अॅमेझॉनचे डिजिटल संगीत जगभरात पहिल्या क्रमांकावर-
ऑनलाईन कटेन्टमध्ये अॅमेझॉनचे डिजिटल संगीत जगभरात पहिल्या क्रमांकावर आहे. रिलायन्स जिओकडून देण्यात येणाऱ्या स्वस्तामधील इंटरनेट दरामुळे व्हिडिओ ऑन डिमांड सेवा विस्तारत आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे ग्रामीण भागातील प्रमाण हे ६५ टक्के आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात इंटरनेटच्या कनेक्टव्हिटीचे प्रमाण केवळ ४० टक्के आहे.
सध्या देशात ३२ ऑनलाईन कटेन्ट आणि व्हिडिओ स्ट्रिमिंग माध्यमे आहेत. या बाजारपेठेचा विस्तार २०२३ पर्यंत ५०० कोटी डॉलर होईल, असे बोस्टन कनस्लटिंग ग्रुपने अहवालात म्हटले आहे.