नवी दिल्ली - कोरोना महामारीचा अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला फटका बसला असताना स्टार्टअप उद्योगांनी चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या सहा महिन्यात 10 हजार नवीन स्टार्टअप सुरू झाले आहेत. वर्षभरात स्टार्टअपमधून 1,70,000 रोजगार निर्माण झाले आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार गेल्या 14 महिन्यात सरकारी निकषानुसार 50 हजार स्टार्टअपची 623 जिल्ह्यांत नोंदणी झाली आहे. कोरोना महामारीमुळे मागील तिमाहीत जीडीपीत 7.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. दुसरीकडे वर्षभरात स्टार्टअपमधून 1,70,000 रोजगार निर्माण झाले आहेत. कोरोना महामारीचा अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. जगभरात पुरवठा साखळी आणि उत्पादन विस्कळित झाले आहे.
हेही वाचा-गोपनीयतेचे धोरण स्वीकारले नाही, तरी सेवा पूर्ण मिळणार - व्हॉट्सअपचा पुनरुच्चार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया ही योजना लाँच केली. तेव्हा 10 हजार स्टार्टअप होण्यासाठी दोन वर्षे लागली होती. मात्र, गेल्या सहा महिन्यांत 10 हजार स्टार्टअपची नोंदणी झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार एका स्टार्टअपमुळे सरासरी 11 लोकांना रोजगार मिळतो. नोंदणीकृत स्टार्टअपकडून रोजगार निर्मितीत लक्षणीय योगदान आहे. सुमारे 48 हजारांहून अधिक स्टार्टअपने 5,50,000 लाख रोजगार निर्माण केले आहेत.
हेही वाचा-बँकांना विजय मल्ल्याची 5,646 कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याचा मार्ग मोकळा
अन्न प्रक्रिया आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्र-
अन्न प्रक्रिया, उत्पादन विकास, अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, माहिती तंत्रज्ञान आणि बिझनेस सपोर्ट सर्व्हिस या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक स्टार्टअपची नोंदणी झाली आहे. स्टार्टअपमध्ये 45 टक्के महिला आंत्रेप्रेन्युअर आहेत.