नवी दिल्ली - भारत हा बहुतेक जगातील सर्वाधिक आयात शुल्क असलेला देश आहे, या मताचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला आहे. भारताच्या पहिल्या दौऱ्यावर आलेले ट्रम्प हे माध्यमांशी बोलत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांना व्यापार करारविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, बहुतेक भारत हा सर्वाधिक आयात शुल्क असलेला देश आहे. हार्ले डेव्हिडसनला (दुचाकी कंपनी) मोठे आयात शुल्क द्यावे लागते. अमेरिकला योग्य आयात शुल्क लागू करावे. अनेक वर्षांपासून भारताबरोबर व्यापार तूट असल्याचेही ट्रम्प म्हणाले.
हेही वाचा-खुली मिठाई खाताय, १ जूनपासून लागू होणार हा नवा नियम
दोन्ही देश हे व्यापार करारात तडजोडी करत असल्याचे यापूर्वीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले आहे. भारत-अमेरिकेमध्ये सुमारे २१,००० कोटींचा (३ अब्ज डॉलर) करार होणार असल्याची ट्रम्प यांनी दिल्लीमधील हैदराबाद हाऊसमध्ये घोषणा केली आहे. या करारानुसार भारत अमेरिकेकडून हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
हेही वाचा-रुपया वधारल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर