कोलकाता - कोरोनाच्या संकटात भारतीय पोस्टाने ग्राहकांना दिलासा दिला आहे. आवर्ती ठेव (रिकरिंग डिपॉझिट) योजनेतील ग्राहकांना उशिरा रक्कम भरूनही दंड न आकारण्याचा पोस्टाने निर्णय घेतला आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना घराबाहेर पडण्यास मर्यादा येत आहेत. ही स्थिती विचारात घेता भारतीय पोस्ट विभागाने आरडी खातेदारांना मे महिन्याचा हप्ता 30 जूनपर्यंत भरण्याची मुदत दिली आहे. उशिरा भरण्यात येणाऱ्या या हप्त्यावर कोणताही दंड अथवा नुतनीकरणाचे शुल्क लागू करण्यात येणार नाही. मार्च ते मे दरम्यान उशिरा मासिक हप्ता जमा भरण्यावरही दंड लागू करण्यात येणार नाही.
केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत देशात टाळेबंदी लागू केली आहे.