ETV Bharat / business

'बंदी लागू केलेल्या चिनी अ‌ॅपकडून भारतीयांचा डाटा मिळवा'

author img

By

Published : Feb 3, 2021, 7:09 PM IST

भाजपचे माजी नेते के. एन. गोविंदाचार्य यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिवांना पत्र लिहून भारतीय डाटाबाबत महत्त्वाची मागणी केली आहे. चिनी अ‌ॅपचे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून (सीईआरटी-इन) सायबर परीक्षण व्हावे, अशी गोविंदाचार्य यांनी गृहमंत्रालयाच्या सचिवांकडे मागणी केली आहे.

के. एन. गोविंदाचार्य
के. एन. गोविंदाचार्य

नवी दिल्ली - केंद्र सरकारने बंदी लागू केलेल्या चिनी अ‌ॅपकडून भारतीयांचा डाटा घ्यावा, अशी मागणी भाजपचे माजी नेते के. एन. गोविंदाचार्य यांनी केली आहे. याविषयी त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिवांना पत्र लिहिले आहे.

भाजपचे माजी नेते के. एन. गोविंदाचार्य यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिवांना पत्र लिहून भारतीय डाटाबाबत महत्त्वाची मागणी केली आहे. चिनी अ‌ॅपचे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून (सीईआरटी-इन) सायबर परीक्षण व्हावे, अशी गोविंदाचार्य यांनी गृहमंत्रालयाच्या सचिवांकडे मागणी केली आहे.

हेही वाचा-सोन्याच्या दरातील घसरणीनंतर चांदी प्रति किलो १,९५५ रुपयांनी स्वस्त

गतवर्षी भारत सरकारने २०० हून अधिक चिनी अ‌ॅपवर बंदी लागू केली आहे. भारतीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका होत असल्याने चिनी अ‌ॅपवर बंदी लागू केल्याचे सरकारने म्हटले होते. हे अ‌ॅप वापरकर्त्यांचा डाटा चोरून विदेशात माहिती पाठवित असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

हेही वाचा-आरबीआयच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून सुरू

पोलीस हे चोरांना केवळ पकडत नाहीत. तर चोरलेले दागिने हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, चिनी अ‌ॅपवर बंदी लागू केल्यानंतर कोणतीही तक्रार निवारण यंत्रणा सुरू झाली नाही. वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारीवर कोणतीही उपाययोजना मिळत नाही. त्यामुळे चिनी अ‌ॅपपकडून भारतीयांच्या डाटाचा गैरवापर होऊ नये, यासाठी सरकारने आश्वस्त करावे. तसेच भारतीयांच्या डाटांचा वापर करून या कंपनीने कोणताही व्यावसायिक लाभ मिळवू नये, यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेही गोविंदाचार्य यांनी पत्रात म्हटले आहे.

डाटा हस्तांतरण करण्याकरता फेसबुक कंपनीवर कर लागू करावा, अशी गोविंदाचार्य यांनी नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मागणी केली होती. केंद्र सरकारने क्लब फॅक्टरी, शेअरइट, लाईक, एमआय व्हिडिओ कॉल (शाओमी), पब्जी, हॅलो, टिकटॉक आदी चिनी अ‌ॅपवर बंदी लागू केली आहे. नुकतेच केंद्र सरकारने ५९ चिनी अ‌ॅपपवर कायमची बंदी लागू असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.