नवी दिल्ली - सरकारने अमेरिकेत उत्पादन होणाऱ्या आणि तेथून आयात केल्या जाणाऱ्या बादाम, अक्रोड आणि डाळींसह २८ वस्तूंवरील आयात शुल्क वाढवण्याची अधिसूचना जारी केली आहे. सरकारने अमेरिकेविरोधात प्रत्युत्तरादाखल ही व्यापारी कारवाई केली आहे. आजपासून हे वाढीव दर लागू होणार आहेत. याचा अमेरिकन व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे.
CBIC ने जारी केली अधिसूचना
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने (CBIC) ३० जून २०१७च्या आपल्या एका जुन्या अधिसूचनेवर पुनर्विचार करून शनिवारी ही अधिसूचना जारी केली. अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांवर लागू असलेले आयात शुल्क पूर्ववत राहील. या कारवाईमुळे भारताला २१.७ कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.
विशेष प्रकारचे झिंगे-मासे या सूचीबाहेरअमेरिकेने भारताच्या स्टील आणि अॅल्युमिनियमवरील शुल्क वाढवले. यानंतर सरकारने अमेरिकेविरोधात कारवाई करण्याचा निर्णय गत वर्षी २१ जूनमध्येच घेतला होता. मात्र, तो अनेकदा पुढे ढकलण्यात आला. आधी २९ वस्तूंवर शुल्क वाढवण्याची योजना होती. मात्र, अधिसूचनेतून विशेष प्रकारचे झिंगे आणि मासे सूचीबाहेरकाढण्यात आले.
काय आहे प्रकरण?अमेरिकेने मागील वर्षी भारताकडून काही स्टीलच्या वस्तूंवर २५ टक्के आणि अॅल्युमिनियमच्या काही उत्पादनांवर १० टक्के शुल्क लावले होते. मात्र, त्याआधीया वस्तूंवर तेथे कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. या कारवाईच्या प्रत्युत्तरादाखल भारताने अमेरिकेकडून आयात होणाऱ्या २८ वस्तूंवरील शुल्क वाढवले आहे.
या उत्पादनांवरील कर वाढवलाअक्रोडवरील शुल्क ३० टक्क्यांवरून वाढवून १२० टक्के आणि काबुली चणे, चणे आणि मसूर डाळीवरील शुल्क ३० टक्क्यांवरून वाढवून ७० टक्के करण्यात आले आहे. इतर काही डाळींवरील शुल्क ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे.
दोन्ही देशांदरम्यानच्या समस्या चर्चेने सुटल्या नाहीतअमेरिकेने भारताशी करत असलेल्या व्यापारात सवलत देण्याची व्यवस्था (GSP) शुल्क मुक्त निर्यात सुविधेअंतर्गत ५ जूनला संपुष्टात आणले. हा मुद्दा चर्चेने सोडवला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. GSP ची सूट संपुष्टात आल्याने भारताशी दरवर्षी अमेरिकेला करत असलेली ५.५ अरब डॉलर मूल्याच्या निर्यातीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.